शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल यंत्रणा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:07 IST

नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका व वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

बाणेर : नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका व वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा सुरू असलेल्या या चौकात सिग्नल उभारण्यात आले असले, तरी केवळ पिवळा दिवा लुकलुकत असल्याने नागरिक संभ्रमावस्थेत प्रवास करीत आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाºया चौकात सिग्नल सुरू करण्यास पालिका व वाहतूक विभागातर्फे विलंब केला जात असल्याने या चौकातून नियमित प्रवास करणाºया नागरिकांकडून कमालीचा असंतोष व्यक्त केला जात आहे.लाखो रुपये खर्च करून राधा चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत; मात्र हे वाहतूक नियंत्रक दिवे केवळ शोभेची वस्तू झाली आहे. परिणामी, छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. मुंबई-बंगळुरू या द्रुतगती मार्गावरील राधा चौकात बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, पाषाण या ठिकाणी ये-जा करण्यासाठी चार प्रशस्त रस्ते आहेत. या महामार्गाच्या बाजूलाच नागरिकांना प्रवासासाठी सेवारस्त्यांची सुविधा आहे.अनेक वर्षांपासून या चौकात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली; मात्र अनेक महिने उलटूनही अद्याप सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही. त्यामुळे अजूनही वाहनचालक इतर वाहनांचा अंदाज घेत प्रवास करत आहेत. त्यामुळे पालिका व वाहतूक विभागाने गांभीर्याने या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी नागरिक-वाहनचालकांकडून केली जात आहे.