शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक धोरण कधी करणार? नीलम गो-हे यांचा सामाजिक न्यायमंत्र्यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 05:20 IST

सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने ज्येष्ठ नागरिकांविषयी धोरण तयार करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र सत्तेत येऊन चार वर्षे झाली, तरी हे धोरण प्रलंबित आहे. हे धोरण कधी करणार,असा सवाल करीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी खुलासा करावा, अशी मागणी शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी शनिवारी केली.

पुणे : सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने ज्येष्ठ नागरिकांविषयी धोरण तयार करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र सत्तेत येऊन चार वर्षे झाली, तरी हे धोरण प्रलंबित आहे. हे धोरण कधी करणार,असा सवाल करीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी खुलासा करावा, अशी मागणी शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी शनिवारी केली.एरंडवणा येथे दीपाली कोल्हटकर या ज्येष्ठ महिलेचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. पुण्यासह राज्यभरात ज्येष्ठ नागरिकांच्या हत्यांचे प्रकार वाढत आहेत. काही प्रकरणांतील आरोपी अद्याापही सापडलेले नाहीत. पोलिसांनी नोकर-परिचारिका पुरविणाºया संस्थांची माहिती संकलित करणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. गोºहे म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणासंदर्भात मी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर प्रत्येक शहरातील पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला होता. त्यानुसार पुणे पोलीस आयुक्तालयात कक्ष स्थापन करण्यात आला आहे; मात्र ज्येष्ठ नागरिकांचे धोरण अद्यााप तयार केले गेलेले नाही. या धोरणांतर्गत ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सोयी-सुविधा पुरविणे गरजेचे आहे.दरम्यान, युती सरकारच्या काळात मातोश्री वृद्धाश्रम योजना सुरू करण्यात आली होती. त्यासाठी भरीव अनुदान आणि जमिनी देण्यात आल्या होत्या. त्यानंतरच्या आघाडी सरकारने या वृद्धाश्रमांचे अनुदान बंद केले होते. आता सरकार बदल होऊन चार वर्षे झाली, तरी हे अनुदान सुरू झालेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा मातोश्री वृद्धाश्रम योजना सुरू करून जेवण, औषधे, देखभाल दुरुस्तीसाठी अनुदान द्यावे, तसेच प्रत्येक तालुक्यात किमान २० लोकांसाठी वृद्धाश्रम उभारण्यासाठी दहा कोटींची तरतूद करावी, अशी मागणीही डॉ. गोºहे यांनी केली.निर्भय दृष्टी प्रकल्पस्त्री आधार केंद्र आणि राज्य महिला आयोगातर्फे बलात्कार पीडित महिलेच्या तपासणीसाठीच्या वैद्याकीय नियमावली अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ’निर्भय दृष्टी प्रकल्प’ आणि महिलांविषयक कायद्यााच्या प्रसारासाठी सांगाती प्रकल्प राबविण्यात येणार आहे.सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या सुमंत मुळगावकर सभागृह येथे उद्या (रविवारी) सकाळी साडेदहा वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, राज्य महिला आयोगाच्या सचिव मंजूषा मोळवणे उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे