शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक केव्हा होणार, सतरा वर्षांपासून बाजार समितीवर प्रशासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:09 IST

पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन झाल्यावरही प्रशासक राज हटत नाही. याने हवेली तालुक्यातील पुढारी व त्यांचे समर्थक ...

पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन झाल्यावरही प्रशासक राज हटत नाही. याने हवेली तालुक्यातील पुढारी व त्यांचे समर्थक बुचकळ्यात पडले आहेत. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे, खडकी, देहुरोड कॉन्टोन्मेंट आणि हवेली तालुक्‍यातील सर्व गावांचा समावेश असणार आहे. वरील निर्णयामुळे आशिया खंडात सर्वात मोठी बाजार समिती असा नावलौकिक असणाऱ्या हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता सूत्रे तब्बल अठरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासक कारभारानंतर हवेलीकरांच्या हाती येण्याचा मार्ग मोकळा झाला होता, पण कोरोना आला आणि हवेलीकरांची स्वप्ने धुळीस मिळाली व आता इतर संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊनही हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत नाहीत, हे अन्यायकारक असेच आहे.

राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे जिल्हा दूध संघ व चार साखर कारखान्याच्या निवडणुका नुकत्याच जाहीर केल्या, पण उच्च न्यायालयाचे निवडणुका घ्या, म्हणून आदेश असतानाही राज्य सरकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्याचे का टाळत आहे, हे न उलघडणारे कोडे झाले आहे, अशी प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन यांनी व्यक्त केली.

मागील सतरा वर्षांपासून बाजार समितीवर प्रशासक काम पाहत आहे. यामुळे तालुक्यातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. बाजार समितीवर अधिक काळ प्रशासक न राहाता, बाजार समितीची सत्ता पुन्हा लोक नियुक्त संचालक मंडळाच्या हाती यावी, यासाठी संचालक मंडळाची निवडणुक लवकरात लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचा विभाजन प्रस्ताव मंजूर झाल्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले होते.

मात्र, आता कोरोना संसर्ग प्रादुर्भाव कमी झाला असताना, इतर जिल्हा स्तरावरील संस्थांच्या निवडणुका राज्य सरकार घेत असताना आणि सुमारे १८ वर्षांपासून लोक नियुक्त संचालक मंडळापासून वंचित असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर का अन्याय केला जातोय, याबाबत खासदार व आमदार काय भूमिका घेणार, याकडे हवेली तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.