शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मुख्य सूत्रधाराचा शोध कधी?

By admin | Updated: December 24, 2014 01:29 IST

बेकायदापणे पिस्तूल बाळगणाऱ्यांना सापळा रचून पकडले जाते. पिस्तूल जप्त करून अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशीही केली जाते

मंगेश पांडे, पिंपरीबेकायदापणे पिस्तूल बाळगणाऱ्यांना सापळा रचून पकडले जाते. पिस्तूल जप्त करून अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशीही केली जाते. मात्र, पिस्तूल येतात कोठून, विक्रीचे ‘रॅकेट’ चालविणारा दलाल कोण, याच्या मुळापर्यंत जाण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहर व परिसरात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामध्ये बेकायदा पिस्तुलांचा अधिक वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पिंपरी पोलिसांनी सोमवारी चिंचवडमध्ये तब्बल सात बेकायदा पिस्तूल आणि ३३ जिवंत काडतुसे जप्त केली. इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा पिस्तूल सापडणे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे. दोन आठवड्यांपूर्वीच कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याची चिखलीजवळील पूर्णानगर येथे हत्या झाली. पुण्यात टोळी युद्धातून दोन खून झाले आहेत. या घटनांमध्ये बेकायदा पिस्तूलचा वापर झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. अशातच सोमवारी सापडलेल्या या शस्त्रसाठ्यामुळे पोलिसांपुढील आव्हान आणखी वाढले आहे. पिस्तूल बाळगणाऱ्यांवर सापळा रचून कारवाई केली जाते. अटक करून चौकशी केल्यानंतर त्यामागचे ‘रॅकेट’ कसे उघडकीस येईल याचा पाठपुरावा अपेक्षित असतो. मात्र तसे होताना दिसत नाही. केवळ अटक केलेल्या आरोपींपर्यंतच पोलीस तपास पोहोचतो. यामध्ये पिस्तूल विक्रीच्या रॅकेटपर्यंत पोलीस का पोहोचत नाहीत. पिस्तूलविक्री करणारे पोलिसांच्या गळाला का लागत नाहीत, असा प्रश्न नागरिक विचारित आहेत. बेकायदापणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पकडलेल्या बहुतेक आरोपींची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्याचे दर वेळी पोलीस सांगतात. परंतु पिस्तूल कोणाकडून आले हे सांगणारे खबरे पोलिसांना का भेटत नाहीत? एकापाठोपाठ एक गुन्हेगारीच्या घटना घडतात. खून पडतात. तीन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी पिस्तूल तयार करणाऱ्याला मध्यप्रदेशातून अटक केली. पिस्तूल बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त करण्यात आले. मात्र, परराज्यांतून पिस्तूल आणून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विकणाऱ्या दलालांचेही मोठे जाळे आहे.