शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘रुपी’च्या दोषींवर कारवाई कधी?

By admin | Updated: March 27, 2016 03:02 IST

सहकार खात्याने रुपी को-आॅपरेटिव्ह बँक डबघाईला आणण्यासाठी तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांना दोषी ठरविले. त्यासंदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर वसुलीची

पुणे : सहकार खात्याने रुपी को-आॅपरेटिव्ह बँक डबघाईला आणण्यासाठी तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांना दोषी ठरविले. त्यासंदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर वसुलीची थेट कारवाई होणे अपेक्षित असतानाही गेल्या २ महिन्यांपासून सहकार खात्याने काहीच केलेले नाही. या दोषींवर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल रुपीचे खातेदार विचारू लागले आहेत.रुपी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची चौकशी १४ वर्षांनंतर पूर्ण झाली आणि त्यात तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले. त्यांच्याकडून १ हजार ४९० कोटी रुपये वसुलीची शिफारासही चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी केली केली. हा अहवाल सहकार आयुक्तांकडे देऊन दोन महिने होत आल्यानंतरही अजूनही या अहवालानुसार वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न केले गेलेले नाहीत, असा आरोप पुणेकर नागरिक कृती समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी केला. ते म्हणाले, कलम ८८ नुसार दोषी ठरविलेल्यांकडून वसुलीचे आदेश दिले आहेत. मात्र अजूनही काहीच करण्यात आलेले नाही. चौकशी १४ वर्षे सुरू राहिली, आता वसुलीचा खेळ १४ वर्षे सुरू राहणार आहे का? एकीकडे असे असताना स्वत:चे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी आंदोलन करणाऱ्या खातेदारांवर मात्र पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत, हा कोणता न्याय आहे. (प्रतिनिधी)खातेदारांची बैठकदोषी संचालक व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने २८ मार्चला सायंकाळी ५ वाजता लक्ष्मी सांस्कृतिक सभागृह, लक्ष्मी बाजार, जुन्या रामोशी गेट पोलीस चौकीजवळ येथे मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती थत्ते यांनी दिली.आंदोलनाचा इशारा रुपीसह महेश, राजगुरुनगर, कराड या बँकांमध्ये झालेल्या वाहन घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावरील प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. स्वच्छतेची भाषा बोलणाऱ्या सहकारमंत्र्यांना हे शोभते का, असा सवालही त्यांनी केला. यासंदर्भात लवकरच सहकार आयुक्तांनी ठोस निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही थत्ते यांनी दिला.