शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी जेव्हा थ्रीडी इमेजिंगने वाहन चालवतात...;केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत सुविधेस प्रारंभ

By विश्वास मोरे | Updated: September 15, 2023 17:44 IST

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी वाहन चालवण्याच्या आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ घेतला...

पिंपरी : नाशिकफाटा येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत दोन आधुनिक व्हर्च्युअल रिॲलिटी सिम्युलेटर बसविले असून, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी वाहन चालवण्याच्या आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ घेतला. डोळ्यावर थ्रीडी व्हीआर घालून प्रशिक्षणाचा अनुभव घेतला.

रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) काम करते. नाशिकफाटा भोसरी रस्त्यावरील या संस्थेस गडकरी यांनी सकाळी अकराला भेट दिली. सुरुवातीला भारत न्यू कार असेसमेंट कंट्रोल सेंटरला त्यांनी भेट दिली. त्यानंतर रस्ते वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना केलेल्या एका वाहनातून प्रवास केला. वाहनाचे सारथ्य सचिव संकेत भोंडवे यांनी केले. त्यानंतर आधुनिक व्हर्च्युअल रिॲलिटी सिम्युलेटरचे उद्घाटन केले. गडकरींनी स्वत: थ्रीडी व्हीआर प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. प्रशिक्षणाविषयी माहिती घेतली.

काय आहे उद्देश...

देशातील सर्वाधिक अपघात मानवी चुकांमुळे होतात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय त्यावर उपाययोजना करते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन आणि जनजागृती केली जाते. अपघात रोखण्यासाठी चालकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी भोसरीतील केंद्रात दोन सिम्युलेटर बसविले आहेत. चालकांना निरनिराळ्या वातावरणात, परिस्थितीत आणि ठिकाणी वाहन चालवताना येणारे अनुभव थ्रीडी इमेजिंगद्वारे घेता येणार आहेत. एकाच मशीनवर विविध वाहनांचे प्रशिक्षण, तसेच दिवसा आणि रात्री वाहन चालविण्याचा थ्रीडी इमेजिंगद्वारे अनुभव मिळणार आहे. चालकांच्या वर्तनाचे विश्लेषण करता येणार आहे. वाहन चालवताना अपघातापूर्वी धोक्याची माहिती देण्यात येणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड