शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

बीआरटीएसला मुहूर्त कधी?

By admin | Updated: July 1, 2015 23:45 IST

औंध-रावेत बीआरटीएस या मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. ठेकेदारांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा नसलेला वचक त्यामुळे दिवसागणीक जनतेच्या पैशांची लूट होत आहे.

विश्वास मोरे , पिंपरीऔंध-रावेत बीआरटीएस या मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. ठेकेदारांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा नसलेला वचक त्यामुळे दिवसागणीक जनतेच्या पैशांची लूट होत आहे. महापालिकेचे या कामावर नियंत्रण नसल्याने तीन वेळा उद्घाटनासाठी मुहूर्तही काढूनही अद्यापपर्यंत वेळेत काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या मार्गाच्या उद्घाटनास मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न शहरवासीय करीत आहेत. एकाच मार्गासाठी वेगवेगळे ठेकेदार काम करीत असल्याने त्यांच्यात कामाबाबत समन्वय नाही. मार्गांच्या कामात एकसंधता नसल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजर्नंतर्गत (जेएनएनयूआरम) सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने स्वारगेट ते निगडी या बीआरटीएस मार्ग तयार करण्याच्या विषयास मंजुरी मिळाली. त्यामागे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दळणवळण सुसह्य व्हावे, शहरवासीयांचा कमी वेळेत गतिमान प्रवास व्हावा, असा उद्देश होता. त्यानंतर देहू-आळंदी-काळेवाडी फाटा, रावेत-औंध, वाकड ते नाशिक फाटा या मार्गांवरही बीआरटी सुरू करावी, असा प्रस्ताव पुढे आला. याबाबतचे नियोजन महापालिकेने केले. कोट्यवधींचा खर्च करूनही शहरातील एकही मार्ग पूर्णत्वास गेलेला नाही. उलट हे मार्ग अडचणींचे ठरले आहेत. -शहरातील बीआरटीएस प्रकल्पाची सुरुवात २००७मध्ये करण्यात आली. सुरुवातीला ४५ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचा एक भाग म्हणून सुरुवातीला दोन मार्गांवर नियोजन करण्यात आले. त्यानंतर २००९मध्ये त्यात वाढ करून शहरातील वेगवेगळ्या दहा मार्गांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नाशिक फाटा ते वाकड आणि काळेवाडी ते देहू-आळंदी रस्ता यासाठी ३७६ कोटी रुपयांचा खर्चही केला. हा मार्ग अर्धवटच आहे. या मार्गांपैकी औंध-रावेत हा मार्ग अगोदर सुरू करू, अशी घोषणा गतवर्षी महापालिकेने केली होती. डिसेंबर २०१४मध्ये अहमदाबाद येथे बीआरटी प्रकल्प पाहणीसंदर्भात दौरा झाला. अधिकाऱ्यांनी औंध-रावेत हा मार्ग १ मार्च २०१५पासून सुरू होईल, असे प्रतिनिधींना सांगितले होते. दुभाजकाबाबत एकसंधता नाही-रावेत ते औंध या मार्गावरील बीआरटीएसच्या लेनमधील दुभाजकाबाबत एकसंधता नसल्याचे दिसून येते. मुकाई चौक रावेतपासून पुनावळेजवळील पुलापर्यंतच्या रस्त्यावर कोठेही दुभाजक नाही. पुढे ताथवडेच्या अर्धा किलोमीटर अलीकडे रस्त्यावर दुभाजक सुरू होतो. त्याची उभारणीही हवी तशी केली आहे. येथून डांगे चौकापर्यंतच्या दुभाजकामध्ये झाडांचे रोपण केले आहे. पुढे जगताप डेअरी ते औंध जिल्हा रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक नाही. हे काम पूर्णपणे अपूर्ण आहे. रस्ता दुभाजकासाठी आवश्यक असणारे साहित्य रस्त्यावरच पडले आहे. ताथवडेजवळील दुभाजकाचे कामही एकसारखे नाही. काही ठिकाणी रस्ता अरुंद झाल्याचे दिसून येते. बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी-निगडी ते दापोडी हा बीआरटीचा पहिला मार्ग सुरू करणे अपेक्षित असताना औंध-रावेत मार्गाच्या कामास गती दिली गेली आहे. डांगे चौकापासून मुकाई चौकापर्यंतच्या रस्त्यावर लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर दोनशे ते तीनशे लहान-मोठे गृहप्रकल्प सुरू आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते आणि त्यांच्यांशी संबंधित व्यावसायिकांचे हे प्रकल्प आहेत. बहुतांश बांधकाम व्यावसायिकांनी बीआरटीएस मार्गाजवळ प्रकल्प अशी जाहिरातबाजीही केली आहे. त्यामुळे बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी बीआरटीचा घाट घातला आहे. वळणावरच बसथांबा-रावेतमधून जाणाऱ्या लेनवर दुभाजक नाही. तसेच ज्या ठिकाणी बसस्टॉप उभारले आहेत, तिथे रस्ता अरुंद झाला झाला आहे. तसेच, रावेत गावाजवळ वळणावरच बसस्टॉप उभारला आहे. त्यामुळे वाहनचालकास कसरत करावी लागणार आहे. मुकाई चौकातील टर्मिनल्सचे काम पूर्ण झालेले नाही. मुहूर्त काढला, पण उद्घाटन नाही-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने बीआरटी मार्गांची घोषणा केली होती. त्यामुळे आपल्याच कालावधीत या प्रकल्पांचे उद्घाटन व्हावे, यासाठी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते प्रयत्नशील होते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील एका मार्गाचे उद्घाटन करायचे, असे नियोजन महापालिकेने केले होते. मात्र, काम वेळेत न झाल्याने हे उद्घाटन लांबले. त्यानंतर कामगार दिनाचा मुहूर्त ठरला. त्यानुसार आयुक्तांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची बैठक घेऊन लवकरात लवकरच काम पूर्ण करावे, अशी सूचना केली होती. वाहतूक नियंत्रण यंत्रणा, पुलाचे काम अपूर्ण-डांगे चौकातून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुजरनगर येथे पुलाचे काम सुरू आहे. हे काम नुकतेच सुरू झाले आहे. सायंकाळी येथे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. तसेच जिल्हा रुग्णालयाजवळील रस्त्यावरील पूल, बसथांबा बीआरटी लेन याबाबत नियोजन नसल्याने काम संथगतीने सुरू आहे. त्यापुढे पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बीआरटी लेनला अजून मुहूर्तही मिळालेला नाही. तसेच सध्या असणाऱ्या वाहतूक नियंत्रण यंत्रणेत बदल केला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.रस्ता एकच; काम मात्र तीन ठेकेदारांना-बीआरटी लेन एकच आहे. मात्र, त्यासाठी तीन वेगवेगळे ठेकेदार काम करीत आहेत. त्यांच्या कामावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वचक आणि नियंत्रण नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मनमानीपणे काम सुरू असल्याचे दिसून येते. जगताप डेअरी ते औंध पुलापर्यंतच्या रस्त्यापर्यंत ठिकठिकाणी कामे अपूर्ण आहेत. कामाबाबतच्या नियोजनात समन्वय नसल्याने अजूनही या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. -याच मार्गावर बसथांबा आणि चौकात पेडिस्ट्रियन सिग्नल बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या ९३ लाख १५ हजार ६३५ रुपयांच्या विषयास मंगळवारी झालेल्या स्थायीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. सिग्नलची निविदा मंजूर होऊन कामाचा आदेश आणि प्रत्यक्ष कामास वेळ लागणार आहे.