शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालय उभारणार कधी?

By admin | Updated: December 6, 2014 04:03 IST

विनाथांबा जलद प्रवास होण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुणे-मुंबई दु्रतगती महामार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला, तरीही दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढत आहे

मंगेश पांडे, पिंपरीविनाथांबा जलद प्रवास होण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुणे-मुंबई दु्रतगती महामार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला, तरीही दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढत आहे. या वर्षात दहा महिन्यांत झालेल्या अपघातांत ३८ जणांना जीव गमवावा लागला आहे. या महामार्गावरील सर्वांत मोठी गैरसोय म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी संपूर्ण महामार्गावर सर्व सुविधांनी युक्त एकही मोठे शासकीय रुग्णालय नाही. यामुळे खासगी रुग्णालयांचे फावले असून, रुग्णांची भरमसाट आर्थिक लूट केली जाते. पुणे-मुंबई ही शहरेअगदी जवळ आली आहेत. दररोज अनेकजण पुणे-मुंबईला ये-जा करतात. अशातच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीच्या समस्येसह अपघातही वाढले. दोन्ही शहरांमधील प्रवास वेळखाऊ होऊ लागला. या सर्व समस्या सुटाव्यात, अपघात कमी व्हावेत यासाठी मोठ्या अपेक्षेने दु्रतगती महामार्ग बांधण्यात आला. मात्र, अपघातग्रस्तांना कमी खर्चात उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालय उभारण्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अपघातानंतर जखमीला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. हे उपचार खासगी रुग्णालयातूनच मिळावेत, अशीच व्यवस्था केली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या महामार्गावर एकही शासकीय रुग्णालय नाही. दु्रतगती महामार्गावर हवी तशी उपाययोजना न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. निगडीतील एका खासगी रुग्णालयाच्या पाच रुग्णवाहिका देहूरोड ते लोणावळ्यादरम्यान उभ्या असतात. तसेच लोणावळा ते मुंबईदरम्यान नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका असतात. याव्यतिरिक्त एका खासगी कंपनीच्या तीन रुग्णवाहिका आहेत.