शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

गव्हाच्या पेरण्या लांबल्या

By admin | Updated: November 27, 2015 01:31 IST

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांत दर वर्षीपेक्षा अत्यंत कमी झालेला पाऊस, धरणांतील पाणीसाठाही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या सुरू झालेल्या हालचाली

राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांत दर वर्षीपेक्षा अत्यंत कमी झालेला पाऊस, धरणांतील पाणीसाठाही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या सुरू झालेल्या हालचाली, गेले महिनाभर महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे शेतीपंपासाठी न मिळालेला वीजपुरवठा, अवकाळी पावसामुळे हवामानातील झालेला बदल, त्यामुळे लांबलेली थंडी आणि आडसाली ऊस तोडून जाण्यात होणारा विलंब या सर्व बाबींमुळे राजेगाव परिसरातील गव्हाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सर्वसाधारणपणे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असणाऱ्या गव्हाच्या पेरण्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच प्रामुख्याने केल्या जातात. परंतु, नोव्हेंबर महिना संपत आला, तरी कुठेही गव्हाच्या पेरण्या झालेल्या दिसत नाहीत. गव्हाच्या पिकाऐवजी कमी पाण्यात येणारे हरभरा पीक घेण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण घटले या वर्षी या भागात दर वर्षीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका यांचे जलस्रोत म्हणावे असे भरलेले नाहीत, तर उजनी धरणातील पाणीसाठाही अत्यंत कमी असल्याने व तोही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या सुरू झालेल्या हालचाली यामुळे या वर्षी गव्हाच्या पेरण्या करण्याचे धाडस या भागातील शेतकरी करत नसल्याचे चित्र आहे. महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे गेले महिनाभर शेतीपंपासाठी वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. या भागातील शेतीपंपासाठी वीजपुरवठा करणाऱ्या भिगवण उपकेंद्रात (दि.४) नोव्हेंबरपासून ३३/२२ केव्हीच्या, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र जळाल्याने या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील शेतीपंपासाठी फक्त २ ते ३ तासच वीजपुरवठा होत होता. सुरळीत वीजपुरवठा होऊन पाण्याअभावी या भागातील गव्हाच्या पेरण्या लांबल्या असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारणपणे गव्हाच्या पिकाला ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागत आहे. त्यातच यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याची कमतरता आहे. परिणामी, पाण्याची उपलब्धता पाहूनच गव्हाची पेरणी करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच करतात. १५ डिसेंबरपर्यंतच पेरणी करावी, नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही. - अप्पासाहेब खाडे, दौंड कृषी मंडल अधिकारी