शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक सिटीचं काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:13 IST

मागची विलिनीकरणाची संधी गमावलेल्या ग्रामस्थांचा सवाल सुधारित बातमी वेध विलिनीकरणाचे महाळुंगे भाग १ ................. दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क ...

मागची विलिनीकरणाची संधी गमावलेल्या ग्रामस्थांचा सवाल

सुधारित बातमी

वेध विलिनीकरणाचे महाळुंगे भाग १

.................

दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विलिनीकरणाची मागची संधी सोडली त्याचा पश्चाताप होत असताना नव्या निर्णयाचे महाळुंगेवासीय स्वागत करीत असले, तरी पीएमआरडीएमार्फत राबविलेल्या योजनांचे काय, हे विचारायला ते विसरलेले नाहीत. नाही तर हेही नाही आणि तेही नाही, अशी अवस्था होईल हे जाणून असल्याने नेमके धोरण काय, याचे उत्तर त्यांना हवे आहे.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मार्फत महाळुंगे येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागातून महत्त्वाकांक्षी हायटेक सिटी उभारण्याचा निर्णय घेतला होता. विलीनीकरणाच्या निर्णयामुळे आता त्या प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न आता ग्रामस्थांना सतावत आहे.

गावातील विकासाची जबाबदारी ग्रामपंचायतीबरोबर पीएमआरडीएकडे आहे. पण गावात विकासकामांच्या बाबतीत पीएमआरडीचे सुरुवातीपासून दुर्लक्ष होत आहे. त्यांनी विकासकामे करताना गावकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे, मात्र तसे होत नसल्याने परस्परविरोधी योजना राबवल्या जात असल्याची तक्रार नागरिक करतात. पीएमआरडीएची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी डॉ. किरण गिते यांच्याकडे होती, तोपर्यंत सर्व माहिती गावकऱ्यांना मिळायची, पण आता त्यांची बदली झाल्यानंतर गावकऱ्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यास प्रशासन दोषी आहे, असे गावकरी सांगतात.

गावात आता महापालिका विलीनीकरणावरुन गावकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम असून सुरू असलेल्या योजना महापालिकेकडे वर्ग होणार की पीएमआरडीएकडे राहणार याविषयी सवाल केला जात आहे.

२५ हजार लोकसंख्या असलेलं महाळुंगे हे गाव पुणे शहरालगत आहे. बालेवाडी, सुसगांव, बाणेर आणि हिंजवडी अशी विकसित गावं शेजारी असूनही आमचा विकास झाला नसल्याची खंत महाळुंगेकरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

महाळुंगेत प्रवेश करताना लागणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अतिशय सुमार दर्जाचे झालेले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने एकाच वेळी निघणं कठीण आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे झालेली नाहीत. जी झालेली आहेत ते रस्ते आता पुन्हा खराब झाले असून गावात असे खूप रस्ते आहेत जे फक्त गावातील नागरिकांच्या कौटुंबिक वादामुळे पूर्ण होऊ शकलेले नाहीत, अशीही गावकऱ्यांची तक्रार आहे.

---------------------

गावात ड्रेनेज,रस्ते आणि डिजिटल शाळा अशा वेगवेगळ्या स्वरूपात विकासकामे सुरू असून आमची ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतीमार्फत चांगला विकास होऊ शकतो.

-मयूर भांडे,

सरपंच, महाळुंगे

................

आम्ही महाळुंगेकरांनी महानगरपालिकेत समाविष्ट होण्यासाठी १९९७ साली विरोध दर्शविला होता. त्याचा आम्हाला आज पश्चाताप होतो. सरकारने आमची ती चूक दुरुस्त करून आमचे गाव महानगरपालिकेत विलीन करावे.

*लक्ष्मण पाडाळे*

अध्यक्ष,

राजश्री शिवराय प्रतिष्ठान.

.......

फोटो ओळ

महाळुंगे गावातील मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून गेल्या काही वर्षांत अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीतून होत असल्याने अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे.