शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला कोणी भाव देतंय का भाव?

By admin | Updated: January 28, 2017 00:10 IST

कांदा काढणीला आलाय.. कोबी, फ्लॉवर बी काढायला आलीय... बीट परिपक्व झालंय... परंतु बाजारात पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने

शेलपिंपळगाव : कांदा काढणीला आलाय.. कोबी, फ्लॉवर बी काढायला आलीय... बीट परिपक्व झालंय... परंतु बाजारात पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने पिकावरील भांडवलही वसूल होत नाही. परिणामी, आमच्या पिकाला कोणी भाव देतं का, भाव? असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रब्बी हंगामातील महत्त्वाच्या कांदापिकाची काढणी सुरू झाली आहे. मात्र कांदाकाढणीच्या कालखंडातच बाजारात कांद्याचे पडलेले दर शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक चिंतेचा विषय बनू लागला आहे. बाजारात पडलेल्या बाजारभावामुळे किमान पिकाच्या उत्पादनावरील खर्च तरी भागेल का? असा प्रश्न उत्पादकांना सतावू लागला आहे. एकंदरीतच, चालू वर्षी कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढणार! असे चित्र आत्तापासूनच स्पष्ट होऊ लागले आहे.पुणे जिल्ह्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वातावरणाशी झुंज देत पिकाची जोपासना करून पिकाचे उत्पादन शेतकरी काढत आहे. मात्र, बाजारात कांद्याचे पडलेले भाव सर्वांच्याच नशिबी येत असल्याने मोठा आर्थिक तोटा उत्पादकांना सहन करावा लागणार आहे. अनेक वर्षांपासून कांदापिकाला हमीभाव ठरवून देण्याची मागणी शेतकरीवर्ग करीत आहेत; परंतु केंद्र व राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात कुठलेही ठोस उपाय योजले जात नसल्याने दर वर्षी शेतकऱ्यांना बाजारभावासाठी संघर्ष करावा लागतो.चालू वर्षी कांदा उत्पादन खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. शेतजमीन तयार करणे, कांदारोपे, मजूर, लागवड, रासायनिक खते व औषधे, काढणी, बारदाना, वाहतूक आदी लागणाऱ्या खचार्मुळे एकरी उत्पादनासाठी कमीत कमी ५० हजार रुपयांचे भांडवल शेतकऱ्यांना गुंतवावे लागले आहे. हंगामात हवामानाने साथ दिल्याने कांद्याला पोषक वातावरण मिळाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.कांदा हे नाशवंत पीक असल्याने शेतकऱ्यांना त्याची जास्त काळ साठवण करण्यात अडचण येत असते. तसेच, आर्थिक गरजेपोटी काढणीनंतर मिळेल त्या भावात बिचाऱ्या शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. कांद्याच्या उत्पादित मालाला समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत येतो. मात्र, यामध्ये व्यापाऱ्याची पोळी सोयीस्कररीत्या भाजली जात आहे. कांद्याच्या बाजारभावासंदर्भातील शासनाच्या अनिश्चित धोरणाचा दर वर्षी पीक उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना बाजारभावाची शाश्वती देण्यासाठी सरकारने उत्पादक खर्चावर आधारित कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.