शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

उपेक्षितांना दुसराच न्याय का ?

By admin | Updated: May 11, 2017 04:52 IST

ठेकेदार कंपन्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या निविदा विनाचर्चा मंजूर करताना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना देण्याच्या घाण

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ठेकेदार कंपन्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या निविदा विनाचर्चा मंजूर करताना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना देण्याच्या घाण भत्त्याबाबत मात्र महापालिका प्रशासन फक्त पत्रोपत्री करण्यात वेळ घालवत आहे. हिवताप निर्मूलन व कीटक प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील हा प्रकार अखिल भारतीय लोकशाही संघटनेमुळे उघड झाला आहे.महापालिकेच्या आरोग्य खात्यात हिवताप निर्मूलन व कीटक प्रतिबंधक विभाग आहे. सुमारे सव्वातीनशे कर्मचारी यात काम करतात. घाणीशी सातत्याने संबंध येणारे कामही याच कामगारांकडून करून घेण्यात येते. त्यामुळे त्यांना वेतनाव्यतिरिक्त दरमहा घाणभत्ता २०० रुपये व धुलाई भत्ता २५० रुपये, असा एकूण ४५० रुपये वेगळा भत्ता द्यावा, अशी मागणी लोकशाही संघटनेने केली होती. त्याला महापालिकेच्या स्थायी समितीने, तसेच सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली. यानुसार महापालिकेवर दरमहा १ लाख ४० हजार ८५० व वार्षिक १६ लाख ९० हजार २०० रुपये इतका आर्थिक बोजा येणार होता.याच एका गोष्टीचा बाऊ करीत प्रशासनाने याबाबत सरकारची मान्यता लागेल म्हणून नगरविकास विभागाला पत्र पाठवले. नगरविकास विभागाने अन्य महापालिकांकडील माहिती मागवली. ते देत असलेला भत्ता व पुणे महापालिकेने प्रस्तावित केलेला भत्ता यात तफावत होती. त्यामुळे नगरविकास विभागाने महापालिकेकडून खुलासा मागवला. त्याला महापालिकेने उत्तर दिले. त्यानंतर नगरविकास विभागाने उत्तर पाठवले की, महापालिकेने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, मात्र तो घेताना सहाव्या वेतन आयोगातील शिफारशी व त्याच्याशी संबंधित नियम, अटी यांचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही नमूद केले.