शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्लाझ्मादानासाठी प्रोत्साहन कशाच्या बळावर दिले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST

दात्यांचा सवाल : कोरोना उपचारपद्धतीतून वगळल्याबद्दल नाराजी प्लाझ्मा दात्यांचा सवाल : डॉक्टरांनी कशाचे आधारे केले उपचार? लोकमत न्यूज नेटवर्क ...

दात्यांचा सवाल : कोरोना उपचारपद्धतीतून वगळल्याबद्दल नाराजी

प्लाझ्मा दात्यांचा सवाल : डॉक्टरांनी कशाचे आधारे केले उपचार?

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा उपचार पद्धतीबाबत गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (‘आयसीएमआर’) मान्यता दिली. वर्षभर प्लाझ्मादानाबाबत सर्वच स्तरांतून जनजागृती करण्यात आली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेले अनेक नागरिक प्लाझ्मादानासाठी पुढे आले. रुग्णांच्या नातेवाईकांनी प्लाझ्मासाठी धावपळ केली. अशातच कोरोना रुग्णांसाठीची प्लाझ्मा उपचार पद्धत कोणत्या निकषांच्या आधारे वगळण्यात आली, या उपचार पद्धतीच्या यशाची टक्केवारी तपासली का, असे प्रश्न दात्यांकडून तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.

कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधून कोरोनामुक्त होणाऱ्या सर्वांना प्लाझ्मा उपचारांसाठी रक्तदान बंधनकारक करावे, अशी मागणीही ऑगस्ट २०२० मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्य शासनाकडे केली होती. राज्य शासनाने राज्यभरात प्लाझ्मा दान अभियान राबवले. प्लाझ्मा थेरपीचा रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचे पुढे आले नाही. दुसरीकडे, वैद्यकीय क्षेत्रातील काही आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्लाझ्मा उपचारांचा थेरपीचा कोरोना रुग्णांना उपयोग झाला नसल्याचे प्रबंध प्रसिद्ध झाले. मग त्याच वेळी प्लाझ्मा उपचार का थांबवले नाहीत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

“प्लाझ्मा थेरपी उपयुक्त नाही, हे कळायला एक वर्ष का लागले हे समजण्यापलीकडचे आहे,” असे मत ‘रक्ताचे नाते’ या संस्थेचे राम बांगड यांनी व्यक्त केले. सामान्यांना परवडणारी ही उपचारपद्धती असून अनेक रुग्ण गंभीर अवस्थेतून बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, प्लाझ्मा उपचाराचा दुष्परिणाम झाल्याचे एकही उदाहरण नसल्याचा दावा त्यांनी केला. ‘आयसीएमआर’मध्ये संशोधनावर आधारित काम करणारे तज्ज्ञ असून तेथे प्रॅक्टिसिंग डॉक्टर नाहीत. मग इतका मोठा निर्णय घेण्याआधी कार्यरत डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली का? की संशयाची सुई दुसरीकडे जायला जागा आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

चौकट

निर्णय चुकला तर नाही?

श्रीनिवास सोनवणे यांनी आतापर्यंत ६ वेळा प्लाझ्मादान केले आहे. त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “माझ्यासारखे अनेक दाते प्लाझ्मासाठी आपणहून पुढे आले. आपल्यामुळे कोरोना रुग्णांना जीवनदान मिळू शकेल, अशा विचाराने इतरांनाही उद्युक्त केले. मात्र, आता प्लाझ्मा उपचारच थांबवण्यात आल्याचे समजले. असे निर्णय गैरलागू तर ठरणार नाहीत ना, अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.”

चौकट

प्लाझ्माबाबत संशोधन अपूर्ण

“कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचार उपयुक्त असल्याचे संशोधन पूर्ण झालेले नाही. पहिल्या काही दिवसांत रुग्णांना प्लाझ्मा दिला तरच तो उपयुक्त ठरतो, असा निष्कर्ष काढला जात होता. मी गेल्या वर्षभरात एकाही रुग्णावर प्लाझ्मा उपचार केले नाहीत किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना प्लाझ्मा आणण्यास सांगितले नाही. कोरोनावरील उपचारांमधून प्लाझ्मा पद्धत वगळण्याचा ‘आयसीएमआर’चा निर्णय योग्य वाटतो.”

- डॉ. सुभाल दीक्षित, माजी अध्यक्ष, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन

--------------