शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेच्या सेवेत‘मेधा’

By admin | Updated: March 16, 2017 04:01 IST

नवीन बम्बार्डियर कंपनीच्या लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या असतानाच, आता भारतीय बनावटीची ‘मेधा’लोकलही

मुंबई : नवीन बम्बार्डियर कंपनीच्या लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या असतानाच, आता भारतीय बनावटीची ‘मेधा’लोकलही पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहे. शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते अनेक नवीन सुविधांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन मेधा लोकललाही हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. सध्या मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर धावत असलेल्या सीमेन्स व बम्बार्डियर या परदेशी कंपन्यांच्या तोडीस तोड ही लोकल बनवण्यात आल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या सीमेन्स, तसेच बम्बार्डियर कंपनीच्या लोकल धावतात. या लोकलची अंतर्गत इलेक्ट्रिकल व अन्य तांत्रिक कामे ही सीमेन्स व बम्बार्डियर कंपनीची आहेत. मात्र, संपूर्णपणे देशी बनावटीची असलेली लोकलची अंतर्गत इलेक्ट्रिकल यंत्रणा व अन्य तांत्रिक कामे ही मेक इन इंडिया अंतर्गत पहिल्यांदाच हैद्राबाद येथील ‘मेधा सर्वो ड्राइव्ह’या भारतीय कंपनीने केली आहे. त्यावरूनच या लोकलला ‘मेधा’हे नाव देण्यात आले. चेन्नईतील रेल्वेच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये मेधा लोकलचे काम पूर्ण करण्यात आले. मेधा लोकल दोन वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवर दाखल झाली होती. त्यानंतर, या लोकलच्या चाचण्या घेण्यास आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांचीही मंजुरी मिळण्यास बराच वेळ गेला. अखेर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या लोकला सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मेधा लोकलची किंमत ही सीमेन्स व बम्बार्डियर लोकलपेक्षाही कमी आहे. बारा डब्यांच्या एका बम्बार्डियर लोकलची किंमत ही ४४ कोटी ३६ लाख एवढी आहे, तर एका मेधा लोकलची किंमत ४३ कोटी रुपये आहे. आतापर्यंत रेल्वेकडून दोन गाड्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी दिली. (प्रतिनिधी)