शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही नदीकाठापासून दूर

By admin | Updated: February 5, 2016 02:22 IST

‘तुमची मिळकत पूररेषेत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे,’ अशा स्पष्ट शब्दांतील महापालिकेच्या नोटिशीने धास्तावलेल्या साडेचारशेपेक्षा जास्त

पुणे : ‘तुमची मिळकत पूररेषेत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे,’ अशा स्पष्ट शब्दांतील महापालिकेच्या नोटिशीने धास्तावलेल्या साडेचारशेपेक्षा जास्त कुटुंबांनी आम्ही नदीपात्रातील नाही तर नदीकाठापासून बरेच लांब असलेले रहिवासी असल्याचा दावा केला आहे. हरित न्यायाधिकरणाच्या निकालाला अनुसरून पालिका आपल्याकडे करीत असलेली विचारणाच मुळात चुकीची असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.पूररेषा कुठे आहे, हे पाहून महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीनंतरच आम्ही घरे घेतली असून, आता आम्ही पूररेषेत आहोत, असे आढळत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मग त्या वेळी परवानगी दिली ती कोणत्या पूररेषेच्या आधारे? असा प्रश्न या रहिवाशांकडून केला जात आहे. या परिसरातल्या फक्त एकतानगरमधील १६ इमारती व त्यातील ४५० सदनिकाधारकांना पालिकेच्या बांधकाम विकास विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय अन्य काही सोसायट्याही यात आहेत. त्यातील अनेकांचे घराचे कर्जही अद्याप फिटलेले नाही. पालिकेच्या या नोटिशीने व नदीपात्रात असलेला रस्ता उखडून टाकण्याच्या न्यायालयीन निर्णयामुुळे आपल्या घरांवरही हातोडा पडतो की काय, अशा धास्तीने काहींनी आपल्या घराची सुरू असलेली दुरूस्तीही थांबवली आहे. संगम सहकारी गृहरचना सोसायटी, जलपूजन सहकारी गृहरचना संस्था, शारदा सरोवर सोसायटी, राज सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, आनंद पार्क सोसायटी, द्वारका इमारत, कुदळे पाटील गार्डन, राधाकृष्ण विहार, गायत्री अपार्टमेंट अशा अनेक सोसायट्यांमधील सदनिकाधारकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. आता ८ फेब्रुवारीला अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासमवेत बैठक होणार आहे.