शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

सनईवादनाने होणार मतदारांचे स्वागत

By admin | Updated: February 21, 2017 02:34 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाच्या

बारामती : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती तालुक्यात २० आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामधील सुपा मतदान केंद्र पोपटी व काटेवाडी मतदान केंद्र गुलाबी रंगाच्या रंगसंगतीनुसार मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी विशेष रंगसंगतीने सजविण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी दिवसभर पारंपरिक पद्धतीने सनईवादनाने मतदारांचे स्वागत करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. या लोकशाही प्रक्रियेला बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करणे आवश्यक आहे. निवडणुक प्रक्रियेतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच नवमतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आदर्श मतदान केंद्राची संकल्पना राज्य निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील सुपा मतदान केंद्रासाठी पोपटी व काटेवाडी मतदान केंद्रासाठी गुलाबी रंगाची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही मतदान केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राध्यक्षासह मतदान केंद्र अधिकारी १ ते ४ महिलाच असणार आहेत. तसेच मदतनीस शिपाई व पोलीसही महिलाच असणार आहेत. महिला पोलीस वगळता सर्व कर्मचारी केंद्राने निवडलेल्या रंगसंगतीचा पोषाख परिधान करणार आहेत. तसेच या मतदान केंद्रात केंद्रासाठी निवडलेल्या रंगाचे पताके, फुगे लावण्यात येणार आहेत.येणाऱ्या मतदारांचे फुले देऊन स्वागत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही मतदान केंद्राच्या आवारात मतदारांना सावलीची व्यवस्था, मधुर संगीताची व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याचे थंड पाणी, कचराकुंडी, अग्निशमन यंत्रणा, रूम फ्रेशनर, वृद्ध अपंगांसाठी मतदान केंद्रावर बैठकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. नारळाची पाने, केळीचे खुंट या ठिकाणी लावण्यात येणार आहे.अधिकाऱ्यांची एका रंगाची वेशभूषा सुपा आणि काटेवाडी या दोन्ही मतदान केंद्रासह तालुक्यातील इतर १९ मतदार केंद्रे ही आदर्श मतदार केंद्रे म्हणून स्थापित करण्यात आली आहेत. त्यामध्ये शिवनगर, माळेगाव बु, पणदरे, मानप्पावस्ती, कोऱ्हाळे, वडगाव निंबाळकर, आठ फाटा, सोरटेवाडी, सोमेश्वरनगर, निंबुत, मुर्टी, मोरगाव, मेडद, डोर्लेवाडी, शिरवली, सांगवी, नीरावागज, काऱ्हाटी, वढाणे, देऊळगाव रसाळ, शिर्सुफळ, पारवडी, पाहुणेवाडी, चिरेखानवाडी या मतदान केंद्रांचा परिसर स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. सुपा आणि काटेवाडी मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र करण्यासाठी भूमी अभिलेख उपाधीक्षक अमरसिंह पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता व्ही. एम. ओहळ, राजेंद्र शितोळे, शाखा अभियंता जयंत काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.मतदान साहित्य केंद्रावरनेरे : भोर तालुका पंचायत समितीच्या सहा गणासाठी व तीन जिल्हा परिषद गटासाठी उद्या मंगळवारी मतदान होत आहे. यासाठी भोर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत-आयटीआय येथे कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य सोमवारी दि. २० सकाळी १० वाजता देण्यात आले़ या वेळी येथे १ हजार १७६ कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी लागणारी वाहतूक यंत्रणा सज्ज असल्याचे व मतदान यंत्र तपासून घेताना.