शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

जल्लोषात स्वागत

By admin | Updated: January 1, 2015 01:18 IST

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आतूर झालेल्यांनी धमाल, जल्लोषात थर्टी फर्स्ट साजरे केले.

पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आतूर झालेल्यांनी धमाल, जल्लोषात थर्टी फर्स्ट साजरे केले. शहराच्या विविध ठिकाणच्या हॉटेलांमध्ये थर्टी फर्स्ट सेलिब्रेशलसाठी गर्दी झाली होती. कोणी डिजेच्या तालावर ठेका धरला, तर कोणी मद्याचे प्याले रिचवत सरत्या वर्षाला गुडबाय केले. मोबाईल एसएमस आणि व्हॉटअ‍ॅपवर प्रबोधन करणाऱ्यांनीही सर्वत्र सुरू असलेल्या जल्लोषात सहभाग नोंदवला. पोलिसांची त्यावर करडी नजर होती. नववर्षाच्या स्वागताची तयारी गेल्या काही दिवसांपाूसन सुरू होती. शासकीय कार्यालयोतील कर्मचारी, तसेच खासगी कंपन्यांतील कामगार, अधिकारी वर्ग यांच्यापैैकी अनेकांनी ग्रुप तयार करून थर्टी फर्स्ट साजरे करण्याच्या कार्यक्रमाची आखणी केली होती. हॉटेल बुकींग केली असल्याने अनेकांनी त्यादृष्टीने नियोजन केले होते. हॉटेल व्यवसायिंकानीही थर्टी फर्स्टसाठी ग्राहकांना विशेष आॅफर दिल्या होत्या. जेवणाची अनलिमिटेड थाळी, गार्डन रेस्टॉरंटमध्ये संगीत कार्यक्रमांचे आयोजन अशा खास आकर्षक योजना जाहिर केल्या असल्याने हॉटेल हाऊस फुल्ल झाली होती. हॉटेलांमध्ये रोषणाई केली असल्याने वातावरण बदलून गेले होते. निगडी, पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाल्हेकरवाडी, वाकड तसेच थेरगाव, मोशी, भोसरी, दिघी परिसरातील हॉटेलांमध्ये सायंकाळी आठ वाजल्यापासूनच गर्दी वाढू लागल्याचे चित्र दिसून येत होते. हॉटेलांची सखंया अधिक असलेल्या पिंपळे सौदागर, रहाटणी काळेवाडी, वाल्हेकरवाडी परिसराला तर रात्री आठ नंतर जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दूरचित्रवाहिनीवरील नववर्षाचे कार्यक्रम घरबसल्या पहाण्यात अनेक कुटुंबांनी प्राधान्य दिले. थंडीत बोहर पडून गर्दी गोंगाटात जाण्याऐवजी घरात बसून दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम पाहून नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटला. रात्री १२ वाजता काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले.४कोठेही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता म्हणुन पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. गस्तीवर अधिक पोलिस तैैनात ठेऊन सुरक्षा यंत्रणा वाढवली होती. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची, वाहनचालकांची तपासणी केली जात होती. ‘ब्रीथ अनालायझर’च्या सह्याने मद्यपी वाहनचालकांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू होते.