शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आतषबाजीने नववर्षाचे स्वागत

By admin | Updated: January 1, 2017 04:43 IST

सरत्या वर्षाला निरोप अन् एकमेकांना शुभेच्छा देऊन नागरिकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करीत शहरातील काही भागात गाणे

पुणे : सरत्या वर्षाला निरोप अन् एकमेकांना शुभेच्छा देऊन नागरिकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करीत शहरातील काही भागात गाणे लावून तरुणाई थिरकताना दिसली; तसेच रात्री बाराच्या ठोक्याला रस्त्यावर उतरत दुचाकीवरून फेरफटका मारत तरुणाईने एकच जल्लोष केला. पहाटेपर्यंत जागे राहून नागरिकांनी नूतन वर्षाचे स्वागत केले. नागरिकांनी गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सरत्या वर्षातील घटनांना उजाळा देत नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. त्यातही तरुणाईचा जल्लोष शिगेपर्यंत पोहोचला होता. क्लब, पब, हॉटेल्स आणि ढाब्यावरून तो ओसंडून वाहत होता. काहींनी नूतन वर्षाच्या स्वागताची तयारी आठवड्याभरापासून सुरू केली होती, तर काही मित्र-मैत्रिणींनी दोनतीन दिवसांपूर्वी नियोजन करून, नववर्षानिमित्त कार्यक्रम आखले. बऱ्याचशा नागरिकांनी घराबाहेर पडून नववर्षाचे स्वागत केले असले, तरी काहींनी विविध वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहणेच पसंत केले. त्यातही थर्टी फर्स्टच्यानिमित्ताने सकाळपासूनच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नववर्षाच्या स्वागताचे एसएमएस पाठविण्यास सुरुवात झाली होती.नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत पुन्हा एकदा बोलणार होते. नवीन वर्षाच्या स्वागताबरोबरच नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकतेचे वातावरण होते. नोटाबंदीने निर्माण झालेल्या स्थितीचा काहीसा परिणाम थर्टी फर्स्टवर दिसून आला. तसेच, थंडीचा कडाका असल्याने नागरिक गरम कपडे परिधान करून रस्त्यावर फेरफटका मारतना दिसले. नववर्षानिमित्ताने काहींनी नवनवीन संकल्पही केले. सायंकाळी उशिरा सुरू झालेला नववर्षाचा जल्लोष रात्री वाढत गेला. मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून गेले. राजकीय कार्यकर्त्यांसह काही संस्थांच्या वतीने नववर्ष स्वागताचे फलकही लावण्यात आले होते. शहरातील विविध संघटनांतर्फे व्यसनविरोध रॅली काढून दुधाचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)पहाटेपर्यंत रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये गर्दीनववर्षानिमित्त घरी जेवण्याऐवजी हॉटेलमध्ये जेवण करण्याचे नियोजन काही नागरिकांनी केले होते. त्यातच गृह विभागाने पहाटे पाच वाजेपर्यंत बार, रेस्टॉरन्ट सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे शहरातील बार व रेस्टॉरन्टमध्ये एकच गर्दी झाली होती. नागरिकांना जेवण करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. त्यातच पुण्यात प्रथमच काही ठिकाणी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन नववर्ष साजरे केले. शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरांतही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.