शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

राहूबेट भारनियमनाने त्रस्त

By admin | Updated: May 4, 2017 01:49 IST

राहूबेट (ता. दौंड) परिसरात रात्री-अपरात्री होत असलेल्या विजेच्या भारनियमनाच्या लपंडावाने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला असून

पाटेठाण : राहूबेट (ता. दौंड) परिसरात रात्री-अपरात्री होत असलेल्या विजेच्या भारनियमनाच्या लपंडावाने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला असून, सद्य:स्थितीत ‘पाणी उशाला, परंतु कोरड घशाला’ याप्रमाणे भीमा आणि मुळा-मुठा या दोन्ही नद्या पाण्याने भरून वाहत असूनदेखील हिरवीगार उभी पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी महावितरणकडून या संदर्भात उपाययोजना करण्यासाठीची मागणी शेतकरी करीत आहे.राहूबेट परिसरातील पाटेठाण, पिलाणवाडी, कोरेगाव भिवर, देवकरवाडी, खामगाव, वाळकी, वडगाव बांडे,पानवली, राहू, डुबेवाडी, टेळेवाडी, मिरवडी, मेमाणवाडी,टाकळी भीमा, उडंवडी, पिंपळगाव आदी गावांत कृषी विद्युत पंपांना सध्या महावितरणकडून भारनियमन कालावधीत आठ तास वीज उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु, रात्री साडेदहाला येणारी लाइट साडेबारा-एक वाजेपर्यंत हुलकावनी देत आहे. तोपर्यंत शेतकरीवर्गाला ताटकळत वाट पाहण्याची वेळ येत आहे. तसेच, लाइट आल्यानंतरदेखील तासन्तास सारखाच लपंडाव सुरू असून यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे आठ तास मिळणारी वीज जेमतेम पाच तासांवर आली आहे. परिणामी रात्री उशिरापर्यंत जागृत राहून पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.यातच उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागत असल्याने सध्या तरकारी सारखी पिके देखील पाण्याअभावी सुकून जात आहे. नद्यांना मुबलक पाणी उपलब्ध असूनदेखील केवळ विजेच्या वेळीअवेळी होत असलेल्या भारनियमनामुळे उसाची उभी हिरवीगार पिके जळून चालली आहेत. परिणामी होत असलेल्या विजेच्या भारनियमनाबाबतीत महावितरणकडून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)भारनियमन रात्री-अपरात्री होत असून, रात्री साडेदहाला येणारी लाइट साडेबारा-एक वाजता येत आहे. आल्यानंतरदेखील वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून, रात्री जागूनदेखील पिके पाण्या अभावी जळून चालली आहेत. - सत्यवान वडघुले, शेतकरी पाटेठाण सद्य:स्थितीत संपूर्ण राज्यातच विजेच्याबाबतीत मागणी जास्त व पुरवठा कमी होत असून, काही तांत्रिक अडचणींमुळे तातडीचे भारनियमन करावे लागत असून वारंवार खंडित होत असलेल्या उपकेंद्राची तत्काळ पाहणी करण्यात येऊन उपाय योजण्यात येतील.- डी. एन. भोळे, कार्यकारी अभियंता, केडगाव विभाग