शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणालाही पेलेना वाहतुकीचा भार

By admin | Updated: December 29, 2014 00:45 IST

राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर जलद वाहतुकीसाठी चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होताना दिसत नाही.

निनाद देशमुख, पुणे राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर जलद वाहतुकीसाठी चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होताना दिसत नाही. हे चौपदरीकरणही खेड टोलनाक्यापर्यंतच झाले आहे. पुढील काम रखडलेले आहे. अर्धवट कामे, अवजड वाहतूक, नियमांची पायमल्ली, सिग्नलचा अभाव आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे पुणे ते आळेफाटा दरम्यानचे अंतर तब्बल १ तासाने वाढल्याचे ‘लोकमत’ पाहणीत आढळून आले.राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहती पुणे-नाशिक महामार्गाने जोडल्या आहेत. यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ असते. जलद वाहतुकीसाठी खेडपर्यंत चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, वाहतुकीचा भार वाढलेलाच दिसतो. याचा त्रास हजारोंच्या संख्येने जाणाऱ्या प्रवाशांना दिसतो. सकाळी १०.२० ला शिवाजीनगर बसस्थानकाहून आळेफाट्याला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. आळेफाटा-पुणे हे जवळ ९० कि.मी. अंतर पार करण्यासाठी दोन तास लागतात. मात्र, अवजड वाहतूक, बेशिस्त वाहनचालक, रस्त्यावर झालेले अतिक्रमणे, यामुळे हे अंतर तासाने वाढले. आळेफाट्याला जायला साडेतीन तास लागले. भोसरी, चाकण आणि आंबेठाण येथील औद्योगिक वसाहतील कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेहमीच या रस्त्यावर दर १५ किलोमीटर अंतरावर होणाऱ्या कोंडीमुळे कामावर वेळेवर पोहचता येत नाही. पुणे ते चाकण हे अंतर ३५ कि.मी. आहे. हे अंतर पार करण्यासाठी ४५ मिनिटे अपेक्षित असताना १ तास लागला. महामार्गादरम्यान दुभाजकांमध्ये मोकळी जागा सोडल्याचे आढळले. यातून मधेच दुचाकी तसेच चारचाकी वाहने बेशिस्तपणे मार्ग ओलांडत असल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावतो आणि वाहतूककोंडी होते.