शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त वीजवाहिनीमुळे पेठांमध्ये भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 05:07 IST

महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी वेळ लागल्याने तसेच पर्यायी व्यवस्थेमधून विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने पुणे शहरातील कसबा पेठ, सोमवार पेठ

पुणे : महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी वेळ लागल्याने तसेच पर्यायी व्यवस्थेमधून विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने पुणे शहरातील कसबा पेठ, सोमवार पेठ व रविवार पेठच्या परिसरात रविवारी सायंकाळी उशिरानंतर प्रत्येकीएक तासाचे भारनियमन करण्यात आले.दांडेकर पुलानजीक फरशी पूल येथे जेसीबीने तोडलेली महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सायंकाळपर्यंत ७५ टक्के पूर्ण झाले होते. वीजवाहिनीला चारपैकी तीन ठिकाणी जाईंट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे तर एक जॉईंट लावण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणार असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले.नादुरुस्त वीजवाहिनीचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत किंवा सोमवारी दुपारपर्यंत पूर्ण झाल्यानंतर महापारेषणच्या रास्ता पेठ १३२ केव्ही जीआयएस उपकेंद्राचा व तेथून सद्यस्थितीत बंद असलेल्या महावितरणच्या सहा उपकेंद्रांचाही वीजपुरवठा सुरू होईल. त्यानंतर इतर उपकेंद्रांतून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू असलेल्या पुणे शहरातील सर्व पेठांसह लूल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी,लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केट यार्ड, स्वारगेट या परिसराचा वीजपुरवठा सहा उपकेंद्रांतून पूर्ववत करण्यात येईल़