शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजाराने कोंडी

By admin | Updated: January 9, 2017 03:03 IST

येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा उच्चांक पहावयास मिळतो़. दर रविवारी भरणाऱ्या

थेरगांव : येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा उच्चांक पहावयास मिळतो़. दर रविवारी भरणाऱ्या बाजारामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीने वाहनचालक आणि येथील नागरिक त्रस्त झाले आहेत़डांगे चौकातून औंध-रावेत आणि चिंचवड - हिंजवडी असे जातात. पुणे -मुंबई महामार्ग आणि हिंजवडी आयटी पार्क या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहतुक कोंडीला सर्वच प्रवासी वैतागले आहेत़ हा वाहतूककोंडीचा प्रश्न अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ च आहे. या ठिकाणी आठवडे बाजाराला फक्त स्थानिक ांबरोबरचशेजारील गावांमधून ट्रक, टेम्पो भरून नागरीक बाजार करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दीचे प्रमाण जाणवते. व्यवसायिकांना योग्य प्रकारे मंडई उपलब्ध नसल्यामुळे पोट भरण्यासाठी रस्त्यावरच भाजी पाला विकावा लागतो व आपला उदरनिर्वाह करावा लागतो. जर लवकरात लवकर मंडईचे पुनर्वसन झाले तर हा वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो़ त्यामुळे मंडईचे पुनर्वसन होणार कधी असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत़ डांगे चौकातील रस्ते हे अधिकृत पार्किंग आणि पथारी व्यावसायिकांसाठीच उभारले असल्याचा भास होतो़ आयटी हब, शैैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे, गृहप्रकल्प, पुणे व शहरात जाणारा औंध रस्ता आणि एका दिशेला पिंपरी-चिंचवडकडे जाणारा मार्ग यामुळे डांगे चौकाला दळण- वळणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे़ त्यामुळे येथील वाहतूककोंडीवर कायमची उपाययोजना अपेक्षित आहे. वाहतूक पोलीस यंत्रणेवर याचा प्रचंड ताण पडतो़ ही वाहतुक कोंडी कमी व्हावी यासाठी महापालिकेने लवकरात लवकर मंडईचे पुनर्वसन करायला हवे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत़ (वार्ताहर)