शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातच आरोपी जेरबंद

By admin | Updated: May 12, 2014 03:52 IST

मानसोपचार तज्ज्ञ आणि मतिमंदांसाठी काम करणार्‍या संस्थेची मदत घेऊन पोलिसांनी आठवडयातच मतीमंद तरूणीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींचा छडा लावला.

पिंपरी : मानसोपचार तज्ज्ञ आणि मतिमंदांसाठी काम करणार्‍या संस्थेची मदत घेऊन पोलिसांनी आठवडयातच मतीमंद तरूणीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींचा छडा लावला. बोपखेल येथील मतिमंद तरुणीवर सामुहिक बलात्कार करणार्‍या तीन नराधमांना जेरबंद करण्यात भोसरी पोलीसांना यश आले आहे. विजयपाल भिक्की सिंग (वय २२, रा. खंडाळा, जि. पुणे, मूळ राजस्थान), दिलावर हाफिज खान (वय २४, रा. वलवणगाव, लोणावळा), यासीन शाकिर खान (वय ३५, रा. लोणावळा, जि. पुणे, दोघेही मूळ रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील विजयपाल लोणावळ्यात रखवालदार म्हणून कामास आहे, तर इतर दोघेजण केटरिंगचे काम करतात. पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बोपखेल येथील पीडित मतिमंद तरुणी भाऊ रागावल्याने ३० एप्रिलला दुपारी घरातून निघून गेली होती. आरोपींमधील विजयपाल याने तरुणीला फसवून पुण्याला नेले. तेथून रेल्वेने लोणावळ्याला नेले. त्यानंतर कार्ला येथील एका लॉजवर विजयपाल व त्याच्या साथीदारांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा पुण्यात आणून सोडले. घरी परतल्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत तरुणीने आईला सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तरुणी मतिमंद असल्याने माहिती पुरेशी मिळत नव्हती. अशा परिस्थितीत आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे या प्रकरणात मानसोपचार तज्ज्ञ व मतिमंदांसाठी काम करणार्‍या संस्थेतील महिला सदस्यांची मदत घेण्यात आली. पीडित मुलीची विचारपूस करीत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत भोसले, सहायक पोलीस निरिक्षक रविकिरण दरवडे, हवालदार पी. बी. तापकीर, किरण काटकर, महेश खांडे, लक्ष्मण नरवडे, राजेंद्र राठोड, योगीता गोडगे, मिरा क्षिरसागर आदींनी केली. पत्रकार परिषदेस सहायक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)