शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

लग्नाचा खर्च परवडेल; घटस्फोटाचा नाही

By admin | Updated: December 20, 2014 23:52 IST

‘प्रत्येक घरात कोणती ना कोणती समस्या असते. मात्र, न्यायालयात गेले तर आपला प्रश्न सार्वजनिक होईल, गुप्तता संपेल यामुळे अनेक जण कौटुंबिक न्यायालयाला जाणे टाळतात.

पुणे : ‘प्रत्येक घरात कोणती ना कोणती समस्या असते. मात्र, न्यायालयात गेले तर आपला प्रश्न सार्वजनिक होईल, गुप्तता संपेल यामुळे अनेक जण कौटुंबिक न्यायालयाला जाणे टाळतात. त्यातच आजच्या काळात लग्नाचा खर्च परवडेल; पण घटस्फोटाचा नाही. शिवाय, कौटुंबिक न्यायालयांवरील खटल्याचा भार यामुळे घटस्फोटासाठी लांबणारा वेळ अन् खर्च दोन्ही न भरून येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळेच नातेसंबंधांना समुपदेशनाने सांधण्याची हळुवार प्रक्रिया करणारी पर्यायी व्यवस्था होणे ही काळाची गरज आहे,’ असे वक्तव्य न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. मुकुंद सारडा यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, न्यू लॉ कॉलेजच्या कौटुंबिक कायदेविषयक मोफत सल्ला केंद्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सारडा बोलत होते. या वेळी समुपदेशक स्मिता जोशी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती शिंदे, अ‍ॅड. राजेंद्र अनभुले, केंद्राच्या समन्वयिका डॉ. सपना देव, वकील कार्यकर्ते उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त सरणाऱ्या वर्षात केंद्राद्वारे मिटविण्यात आलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये विवाहपूर्व समुपदेशनापासून लिव्ह इन रिलेशनशिप या वादापर्यंत ४१५ प्रकरणे मिटविण्यात आली. यामध्ये सर्वाधिक वैवाहिक मतभेद असलेले १६५ खटले, तर नातेसंबंधांतील ताणतणावांची १२२ प्रकरणे मिटविण्यात आली.या वेळी डॉ. सारडा म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमध्ये कौटुंबिक वाद हे मिटविण्यासाठी असतात, याचे भान जागे होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान तयार करणे हे मुख्य उद्देश पाळले जातात.’’ डॉ. शिंदे म्हणाल्या, ‘‘समुपदेशनाचा उपयोगही संबंधित पक्षकाराला चूक मान्य झाल्यानंतरच होतो. यासाठी त्यांना मानसोपचाराची अत्यंत गरज असते. मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे हे आजही लाजिरवाणे मानले जाते; पण आपले कुटुंब वाचविण्यासाठी त्याची गरज आहे आणि सकारात्मक परिणाम दिसला, की पक्षकार ही योग्यरीत्या दखल घेऊ लागतात. तुटलेल्या नात्यांचा मुलांवरही वाईट परिणाम होत असतो. ते स्वत:ही मग विभंगलेलीच कुटुंबव्यवस्था निर्माण करतात. हे थांबविण्यासाठी पहिल्याच कुटुंबात प्रयत्न होणे आवश्यक आहे. या वेळी इतर वकील व पक्षकारांनीही अनुभवकथन केले. डॉ. सपना देव यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)४विवाहपूर्व समुपदेशन : २९४वैवाहिक मतभेद : १६५४पुनर्विवाह समस्या : १०४एकेरी पालकत्व : १०४मुलांच्या समस्या : २५४लिव्ह इन रिलेशनशिप : १०४घटस्फोटानंतरच्या समस्या : १८४ज्येष्ठ नागरिक समस्या : १०४नातेसंबंधांतील समस्या १२२४इतर कौटुंबिक समस्या ववारसा हक्क : १६