शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
4
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
5
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
6
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
7
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
8
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
9
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
10
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
11
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
12
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
13
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
14
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
15
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
16
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
17
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
18
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
19
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
20
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

वेबसाइट ‘हॅक’चा फसला प्रयत्न

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

हिंजवडी आयटी पार्कमधील विविध कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावर तोडगा काढणे, त्यांना पायाभूत सुविधा मिळवून दणे या उद्देशाने स्थापन झालेल्या हिंजवडी

वाकड : हिंजवडी आयटी पार्कमधील विविध कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावर तोडगा काढणे, त्यांना पायाभूत सुविधा मिळवून दणे या उद्देशाने स्थापन झालेल्या हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशन (एचआयए) या संघटनेची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न एका हॅकर्स ग्रुपने केला.ही बाब लक्षात येताच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ ती वेबसाइट बंद केली. त्यामुळे हॅकर्सचा उद्देश असफल ठरला असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हिंजवडी पोलीस ठाण्यात अथवा सायबर सेलकडे याबाबत फिर्याद दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.हिंजवडी आयटी क्षेत्राचा विस्तार होत आहे. जागतिक स्तरावर या आयटी क्षेत्राने स्थान मिळविले असताना त्यावर काहींची वाकडी नजर पडू लागली आहे. जागतिक स्तरावर हॅकर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्युनिशियन हॅकर्स ग्रुपने सायबर अटॅक करण्याचा प्रयत्न चार दिवसांपूर्वी केला. मुख्य सर्व्हर तातडीने बंद करून असोसिएशनची वेबसाइट बंद करण्यात आली. वेबसाइटवर ह्यहॅक्ड बाय फल्लागा टीमह्ण असा मजकूर दाखवण्यात येत आहे. त्यामुळे हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या वेबसाइटवर फल्लागा ग्रुपचा सायबर हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आयटी क्षेत्रालगतचा परिसर, गावे, त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा, त्यासाठी शासन, एमआयडीसी या शासकीय संस्थांकडे पाठपुरावा करण्याचे, तसेच दोहोंमध्ये समन्वय साधण्याचे काम एचएआय ही संघटना करते. कर्मचाऱ्यांना सुरक्षा आणि वाहतूक सुविधा मिळवून देण्यासाठी दुवा म्हणून ही असोसिएशन काम करते. या संघटनेकडे हिंजवडीतील सुमारे दीडशेहून अधिक आयटी कंपन्यांची माहिती संकलित केलेली आहे. एकाच ठिकाणी विविध आयटी कंपन्यांची माहिती उपलब्ध असल्याने असोसिएशनच्या वेबसाइटला हॅकर्स ग्रुपने टार्गेट केले होते. वेबसाइड हॅक केल्याचे समजताच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून असोसिएशनची वेबसाइट बंद केल्याने हॅकरचा उद्देश असफल झाला. याबाबत हिंजवडी पोलिसांकडे संपर्क साधला असता, असा काही प्रकार घडल्याची फिर्याद पोलिसांकडे आलेली नाही. सायबर सेलकडेसुद्धा कोणी फिर्याद दाखल केलेली नाही. त्यामुळे या प्रकाराबद्दल पोलिसांना काहीच माहिती नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर या आयटी क्षेत्राने स्थान मिळविले असताना त्यावर काहींची वाकडी नजर पडू लागली आहे अशी चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)मुख्य सर्व्हरच्या मार्फत असोसिएशनची वेबसाइट तत्काळ बंद केल्याने वेबसाइटवरील माहिती (डाटा) मिळविण्याचा हॅकर्सचा उद्देश सफल होऊ शकला नाही. फल्लागा या ट्युनिशियन इस्लामी हॅकर ग्रुपने हा प्रयत्न केला होता. हा गंभीर प्रकार आहे. योग्य ती दक्षता घ्यावी लागणार आहे. - अनिल पटवर्धन, अध्यक्ष, हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशन