शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वेधशाळाच देणार मोबाईलवर हवामानाचा अंदाज

By admin | Updated: December 24, 2014 01:33 IST

विविध खासगी संस्था वेधशाळेचा अंदाज मोबाईलवर देण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत असतानाच त्यात आता शासनाचा भारतीय हवामानशास्त्र विभागही उतरला आहे.

राहुल कलाल, पुणेविविध खासगी संस्था वेधशाळेचा अंदाज मोबाईलवर देण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत असतानाच त्यात आता शासनाचा भारतीय हवामानशास्त्र विभागही उतरला आहे. कोणत्याही संस्थेच्या मार्फत न जाता हवामानशास्त्र विभागाने स्वत:चा अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप विकसित केला आहे. ‘इंडियन वेदर’ असे नाव असलेला हा अ‍ॅप इतर अ‍ॅपप्रमाणे कोणीही सहजरीत्या डाऊनलोड करू शकणार आहे. यामुळे आता नागरिकांना शासनाचा अचूक अंदाज घरबसल्या मिळणार आहे.शंभरी उलटलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाचा हवामानाचा अंदाज वर्तविण्यावर दबदबा होता. गेल्या १० वर्षांपूर्वीपर्यंत देशात हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारी हवामानशास्त्र विभाग ही एकमेव संस्था होती. मात्र, ही संस्था सरकारी असल्यामुळे ती नागरिकांपासून दुरावलेलीच होती. हवामानाचा अंदाज तळागाळापर्यंतच पोहोचत नव्हता. मात्र, गेल्या १० वर्षांत खासगी संस्थांनी हवामान अंदाज वर्तविण्याच्या क्षेत्रात उडी घेतल्याने स्पर्धा निर्माण झाली. या क्षेत्रातील फायदा लक्षात घेऊन विविध खासगी संस्था, कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढली. अशा या स्पर्धेत मागे पडत असल्याचे लक्षात येताच हवामानशास्त्र विभागाने आपले अंदाज सर्वसामान्यांपर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याअंतर्गत स्वत:चे संकेतस्थळ आणि प्रत्येक प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे म्हणजेच वेधशाळांची संकेतस्थळे सुरू करण्यात आली. सुरुवातीला बेसिक असलेली ही संकेतस्थळे काळाच्या ओघात अपडेट होत गेली. यामुळे नागरिकांपासून दुरावलेल्या वेधशाळा पुन्हा त्यांच्या जवळ गेल्या. शासकीय संस्था असल्यामुळे नागरिकांच्या या संस्थांच्या माहितीवर विश्वास असल्याने संकेतस्थळे पाहण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. याच काळात खासगी संस्थांनी पुढे जात अ‍ॅन्ड्राईड मोबाईल अ‍ॅप विकसित करून त्यावर नागरिकांना घरीच हवामानाची माहिती देण्यास सुरुवात केली. हे लक्षात घेताच भारतीय हवामानशास्त्र विभागानेसुद्धा मोबाईल अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही खासगी संस्थेच्या माध्यमातून हे अ‍ॅप विकसित करण्यापेक्षा विभागाने स्वत:च हा अ‍ॅप विकसित केला, अशी माहिती हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ राहुल सक्सेना यांनी दिली.‘इंडियन वेदर’ नावाचे हे अ‍ॅप मोफत असून, अ‍ॅन्ड्राईड मोबाईल वापरत असलेले कोणीही ते डाऊनलोड करू शकतो. प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध झाले असून, इतर अ‍ॅप डाऊनलोड करतात. त्याप्रमाणेच ते करता येते, असेही सक्सेना यांनी सांगितले.