शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी बचती’च्या शपथा गेल्या वाहून

By admin | Updated: August 10, 2016 01:38 IST

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शेती आणि जनावरांची तहान भागवत असताना ग्रामस्थांना तारेवरची

अंथुर्णे : दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शेती आणि जनावरांची तहान भागवत असताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र यंदा धरणक्षेत्रामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे नीरा डावा कालव्याला शेतीसाठी आवर्तन सुटले आहे. कालव्याचे पाणी ओढे, नाल्यांमध्ये पाझरून येत आहे. टंचाईच्या दिवसांमध्ये गावागावांत घेतलेल्या ‘पाणी बचती’च्या शपथा केव्हाच वाया जाणाऱ्या पाण्याबरोबर वाहून गेल्या आहेत. हे पाणी साठवण्यासाठी व जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी काही जागरूक नागरिकांनी केली आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ होता. अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामस्थांसह मुक्या जनावरांचे पाण्यासाठी अतोनात हाल झाले. परिस्थिती बदलली. इंदापूर तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात तर तालुक्याबाहेर जास्त प्रमाणावर पाऊस पडल्याचा या परिसराला फायदा झाला. पाणीटंचाई कमी झाली. पावसाच्या हलक्या शिडकाव्यामुळे जनावरांना गवत उपलब्ध झाले. धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे प्रशासन वाया जाणाऱ्या पाण्याबाबत उदासीन झाले आहे. परिणामी ओढे-नाल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. पाण्याचे महत्त्व तुर्तास तरी कुणास पटत नसल्याचेच या दिसून येत आहे. एप्रिल मे महिन्यात तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असतो, पाणी मिळविण्याकरिता अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. मोठ्या प्रमाणवर पैशाचा अपव्यव केला जातो. प्रसंगी पैसे देऊनही वेळेला पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्या वेळी मात्र पाण्यासाठी दाही दिशा होते. (वार्ताहर)