शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वीजजोड तोडण्याची मोहीम थंडावणार

By admin | Updated: March 19, 2017 03:51 IST

महावितरणच्या बारामती मंडल अंतर्गत १ हजार ५९ पाणीपुरवठा योजनांचे २८ कोटी ४० लाख रुपये थकीत आहेत. महावितरणच्या वतीने मार्च अखेरचे ‘लक्ष्य’ पूर्ण करण्यासाठी

बारामती : महावितरणच्या बारामती मंडल अंतर्गत १ हजार ५९ पाणीपुरवठा योजनांचे २८ कोटी ४० लाख रुपये थकीत आहेत. महावितरणच्या वतीने मार्च अखेरचे ‘लक्ष्य’ पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. या विरोधात ग्रामीण भागात संताप व्यक्त करण्यात येत होता. त्याची तीव्रता वाढण्याच्या अगोदरच पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीजबिलासाठी ‘सवलत’ देण्यात येणार आहे. महावितरणच्या बारामती मंडलात बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, शिक्रापूर, केडगाव, रांजणगाव, भोर, सासवड, पुरंदर, जेजुरी, नीरा आदींचा समावेश आहे. महावितरणच्या या कार्यालयांतर्गत १ हजार ५९ पाणीपुरवठा योजनांचे २८ कोटी ४० लाख रुपये वीजबिलाची थकबाकी आहे, अशी माहिती बारामती मंडलाच्या सूत्रांनी दिली. महावितरणने मार्चअखेर थकीत वीजबिलासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली होती. अनेक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे ग्रामस्थ हवालदिल झाले होते. या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. याच अनुषंगाने महावितरणचे मुख्य अभियंता (वाणिज्य) भालचंद्र खंडाईत यांनी परिपत्रक पाठवून थकीत वीजबिलाबाबत सवलत दिली आहे. राज्यातील सर्वच पाणीपुरवठा योजनांना ही सवलत लागू होणार आहे. त्यानुसार थकीत बिलाची २० टक्के रक्कम आकारणी, चालू बील आकारणी करून उर्वरित थकबाकी वसुलीसाठी चार टप्पे देण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. ग्रामस्थांचा रोष वाढण्यापूर्वीच हा निर्णय घेतल्याने ऐन उन्हाळ्याच्या काळात पाणीपुरवठ्यावर येणारी संक्रात टळली आहे. धडक मोहीम राबवूनदेखील आजअखेर ८७ लाख रुपये थकीत वसूल झालेले असल्याचे बारामती मंडलाचे उपव्यवस्थापक जी. पी. ताम्हाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वीजबिल भरणा सवलतीनुसार करा : प्रांताधिकाऱ्यांचे आदेशथकबाकीदार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी महावितरणच्यावतीने नवीन वीजबिल भरणा सवलत योजना लागू केली आहे. या योजनेतील तरतुदीनुसार बारामती व इंदापूर तालुक्यातील थकबाकीदार संस्थांनी तातडीने देयके अदा करून खंडित वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा. कोणालाही पाणीटंचाईची झळ बसणार नाही, याची काळजी घेतानाच उत्पन्नवाढीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी वसुलीची मोहीम गतिमान करण्याच्या सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आज केल्या.येथील पंचायत समितीच्या सभागृहात इंदापूर व बारामती तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, बारामतीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे, इंदापूरचे गटविकास अधिकारी रमेश बिचुकले, महावितरणचे बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर घुमे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे उपस्थित होते.बारामती व इंदापूर तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या थकीत बिलामुळे महावितरणच्यावतीने संस्थांचा वीजपुरवठा खंडित केला होता. यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. ऐन टंचाईच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक संस्था एकरकमी थकीत बिलाची परतफेड करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.