शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही इथेच राहून शेती करू

By admin | Updated: August 30, 2014 00:12 IST

आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर डोंगराचा काही भाग कोसळून १५१ जण गाडले गेलेल्या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे

घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर डोंगराचा काही भाग कोसळून १५१ जण गाडले गेलेल्या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे. एक महिना होऊनही माळीण गावातील सुदैवाने बचावलेले लोक व त्यांचे नातेवाईक दु:खातून सावरलेले नाहीत. तात्पुरती घरे बांधण्याचे काम सुरू असून, सध्या हे लोक आसाणे आश्रमशाळेत आश्रयाला आहेत. माळीण ग्रामस्थांचे अडिवरे गावाजवळ कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घोडेगाव येथे झालेल्या बैठकीत झाला आहे. मात्र, पुनर्वसनाबाबत त्यांच्यात एकमत नाही. बाहेरगावी राहणारे माळीणचे लोक डिंभे, घोडेगाव अशा सधन भागात पुनर्वसन करून मागत आहेत, तर माळीणमध्ये राहणारे लोक येथेच जवळपास पुनर्वसन व्हावे, अशी मागणी करत आहेत. शासनाने अडिवरे गावाजवळ जागा निश्चित केली असली तरी या जागेलाही सगळ्यांची पसंती नाही. तसेच गावातील १५ तरुणांना नोकरीची गरज आहे. त्यांना शासनाने नोकरीत घ्यावे, अशी मागणीदेखील माळीण ग्रामस्थ करत आहेत. माळीण फाट्यावर असलेल्या शाळेच्या पटांगणात तात्पुरती पत्र्यांची ३० घरे बांधण्याचे काम सुरू असून, दि. १० सप्टेंबरपर्यंत ही घरे ताब्यात दिली जाणार आहेत. या घरांचे काम सध्या युद्धपातळीवर येथे सुरू आहे, तर अडिवरे गावाजवळ भैरवनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत घोडेगाव येथील बैठकीत निर्णय झाला आहे. या निर्णयाला बैठकीत सर्वांनी मान्यता दिली. मात्र, सध्या या जागेला देखील विरोध होऊ लागला आहे. माळीण लोकांचे ईथंच जवळपास पुनर्वसन झाले तर या लोकांना शेती करता येईल. शहरातील लोक खाली पुनर्वसन मागत आहेत. त्यामुळे त्यांच्यात द्विधा मनस्थिती आहे. या लोकांमध्ये एकमत करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे यांनी सांगितले.प्रत्येक मृत व्यक्तीमागे दहा ते अकरा लाख रुपये मिळणार आहेत. आर्थिक मदतीबरोबरच सर्व योजनांचा फायदाही माळीण ग्रामस्थांना देण्यात आला आहे. अनेक मृतांच्या वारसांची नोंद झाली असून, हे मदतकार्य वाटप करण्यासही सुरुवात झाली आहे. घटनास्थळी माळीण गावात कोणीही राहत नाही; मात्र माळीण पाहायला येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. (वार्ताहर)