शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणात तुम्हाला पण अडकवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माळेगाव : रविराज तावरे गोळीबार प्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित तावरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माळेगाव : रविराज तावरे गोळीबार प्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित तावरे यांनी आपल्याला धमकी देण्यात आल्याचे समाज माध्यमांवर पोस्ट लिहीत आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माळेगाव हादरले असून या प्रकाराची उलटसुलट चर्चा सुरू आहे.

रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर मोरे टोळीवर मोका लावण्यात आला. दोनच दिवसांपूर्वी या प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना अटक करण्यात आली होती. याचे तीव्र पडसाद गावात उमटले. त्यांना खोट्या गुन्ह्याबाबत अटक करण्यात आल्याचे म्हणत त्यांच्या समर्थनार्थ गाव बंद करण्यात आले. याप्रकरणी रणजित तावरे यांनी समाज माध्यमांवरून संदेश पाठवत मला फिर्यादीच्या नातेवाईकांकडून तुला पण गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी येत असल्याबद्दल खुलासा केला आहे. या संदेशामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. समाज माध्यमावरील या पोस्टमुळे गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सतर्क आहे.

रणजित तावरे यांची फेसबुक पोस्ट...

‘मला अप्रत्यक्ष ३१ मेच्या फिर्यादीच्या निकटवर्तीयांकडून धमकी मिळत आहे. आम्ही तुला या गुन्ह्यात अडकवू, मला जे कोणी आहेत त्यांना सांगणे आहे की तुम्ही पाहिजेत ते खुशाल करा. हा पट्ट्या न डरेगा ना पीछे हटेगा. कारण नीतीमत्ता स्वच्छ आहे.’ हा संदेश व्हायरल होत आहे.

फोटो ओळी : रणजित तावरे यांनी सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट.

१००७२०२१-बारामती-१४