फुरसुंगी : पोस्टाला वाईट दिवस आले, असे बोलले जाते; परंतु सरकारी कागदपत्रे ही पोस्टाद्वारेच मिळत असल्याने पत्रारसाठी पोस्टमनला अक्षरश: विनवण्या करण्याची वेळ नागरिकांवर आल्याची परिस्थिती आहे. पोस्टाकडे मनुष्यबळ कमी असल्याने बऱ्याच वेळा ‘पत्ता सापडत नाही’ असा शेरा मारून पत्रे परत पाठविली जात आहेत.एका इन्शुरन्स कंपनीने ८ डिसेंबरला भवानी पेठ पोस्ट आॅफिसमधून स्पीड पोस्टाने गाडीच्या पॉलिसीची कॉपी पाठविली होती. ९ डिसेंबरला फुरसुंगीच्या पोस्ट आॅफिसात ती कॉपी आली. पाकिटावर स्पष्टपणे प्लॉट क्रमांक, रस्ता क्र., भागाचे नाव, गावाचे नाव, पिनकोड असतानाही ‘अपूर्ण पत्ता’ शेरा मारून पोस्टाने १० डिसेंबरला ती कॉपी परत पाठविलीे. याबाबत विचारणा केली असता, ‘त्या भागासाठी पोस्टमन नाही, मागणी केली,’ असे उत्तर देण्यात आल्याचे असे प्रवीण होले यांनी सांगितले.
आमचेच पत्र हरवले..!
By admin | Updated: January 12, 2017 03:13 IST