शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी आम्ही भाजपात

By admin | Updated: January 10, 2017 03:20 IST

आम्ही एकत्रित असताना, शहराचा विकास साधला. विकासाला खीळ बसू नये, अशी आपली भूमिका आहे, विकासाला खीळ बसणार नाही

पिंपरी : आम्ही एकत्रित असताना, शहराचा विकास साधला. विकासाला खीळ बसू नये, अशी आपली भूमिका आहे, विकासाला खीळ बसणार नाही, हा विश्वास भाजपात कार्यरत असलेल्या आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी तसेच भाजपाच्या नेत्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी महापौर आझम पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पानसरे म्हणाले, ‘‘आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार विलास लांडे तसेच आमदार महेश लांडगे आम्ही सर्वांनी एकत्रित काम केले आहे. १९८६ पासून एकत्र होतो. शहराचा विकास करताना कधी भेदभाव केला नाही. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले आहे. भाजपामध्ये राजकीय कारकिर्द नव्याने सुरू करणार आहे.’’ शहर विकासात खीळ बसता कामा नये, ही भूमिका आहे. आणखी चांगल्या पद्धतीने विकासकामे करण्याचा विश्वास भाजपने दिला आहे. भाजपातील पदाधिकाऱ्यांशी पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे मला वेगळे वाटत नाही. यापूर्वी एकदा उद्विग्न होऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा प्रसंग ओढवला होता, त्या वेळी जवळचे कार्यकर्ते, सहकारी यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी भाजपात प्रवेश करताना कोणाचा कौल घेतला? या प्रश्नाला उत्तर देताना तेम्हणाले, या वेळी जुन्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला.या पत्रकार परिषदेस खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, बाबू नायर, प्रमोद निसळ, कुलकर्णी, राजेश पिल्ले, सदाशिव खाडे, उमा खापरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पानसरे यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल खासदार साबळे म्हणाले, ‘‘पानसरे यांच्या आगमनामुळे भाजपाला फायदा होणार आहे. त्यांच्यामुळे निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांनाही पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल.’’ आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘गतकाळात आमच्याकडून काही चुका झाल्या, त्या दुरुस्त करण्याची ही वेळ आहे, असे समजून एकत्र आलो आहोत. झाले गेले विसरून जाऊन आझम पानसरे यांना भाजपात सामावून घेतले आहे. तेसुद्धा आमच्याबरोबर मुंबईत असतील, असा प्रयत्न राहील. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना शब्द दिला आहे.’’ आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘पानसरे हे माझ्यासाठी राजकीय गुरू आहेत. गुरूंचे पुनर्वसन व्हावे, ही मनोमन इच्छा आहे.’’