शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेस आम्हीही तयार...

By admin | Updated: February 10, 2017 02:55 IST

चिटणीस बखरीत काल्पनिक इतिहास लिहिला असून, गडकरींचे समर्थन करणाऱ्या कलाकारांनी तत्कालीन पुरावे घेऊन यावेत, आम्ही चर्चेसाठी कधीही तयार आहोत

पुणे : चिटणीस बखरीत काल्पनिक इतिहास लिहिला असून, गडकरींचे समर्थन करणाऱ्या कलाकारांनी तत्कालीन पुरावे घेऊन यावेत, आम्ही चर्चेसाठी कधीही तयार आहोत, असे जाहीर आवाहन करणाऱ्या माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचे हे निमंत्रण अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने खुल्या दिलाने स्वीकारले आहे. त्यांना परिषदेतर्फे पत्र पाठवून तारीख आणि वेळ ठरविली जाणार असून, हा कलगीतुरा पुण्यातच रंगण्याची शक्यता आहे. ‘राजसंन्यास’ या पुस्तकात थोर नाटककार राम गणेश गडकरी यांनी छत्रपती संभाजीराजांची बदनामी केल्याप्रकरणी संभाजी उद्यानातील गडकरी यांचा पुतळा फोडण्यात आला, त्याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले, साहित्य संमेलनातही गडकरी पुतळा फोडण्याच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. नाट्य परिषदेच्या मध्यवती शाखेसह कोथरूड व पुण्याच्या शाखेने याचा निषेध नोंदविण्यासाठी एक बैठक पुण्यात आयोजिली होती. जोपर्यंत गडकरी यांचा पुतळा उद्यानात बसविला जात नाही तोपर्यंत ही आंदोलनाची चळवळ सुरूच राहाणार असल्याचा एल्गार या बैठकीत केला. दरम्यान, गडकरींनी राजसंन्यास नाटकात केलेली बदनामी ही इतिहासाच्या आधारे केली आहे, असे भासवले जात आहे. त्यासाठी चिटणीस बखरीचा पुरावा दिला जात आहे. (प्रतिनिधी)