शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

समाविष्ट गावांच्या ‘डीपी’चा मार्ग मोकळा, मुख्य सभेत इरादा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 05:02 IST

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी आवश्यक असलेला इरादा जाहीर करण्यास गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.

पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी आवश्यक असलेला इरादा जाहीर करण्यास गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. यामुळे आता डीपीचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासनाकडून लवकरच काम सुरु करण्यात येईल.शासनाच्या आदेशानुसार आॅक्टोबर २०१७मध्ये शहराच्या हद्दीलगतची सुमारे ११ गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली. यामुळे या गावांची संपूर्ण जबाबदारी आता महापालिकेवर आली आहे. यामुळे नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेने गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम २३ नुसार इरादा जाहीर करुन पुढील प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. हा डीपीचा इरादा जाहीर करण्याच्या प्रस्तावाल शहर सुधारणा समितीने मान्यता देऊन अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. त्यानुसार नुकत्याच झालेल्या सभेत या डीपीचा इरादा जाहीर करण्यास मान्यता दिली.यासाठी नियोजन अधिकारी म्हणून राजेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यास सभेने मान्यता दिली. त्यानुसार आता नियोजन अधिकारी या गावातील जमीन वापर (ईएलयू), आरक्षण टाकणे, त्यावर हरकती व सूचना मागविण्याचे काम सुरू करणार आहेत. या वेळी सदस्यांनी समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचे काम तातडीने सुरू करून, डीपीची अंमलबजावणीदेखील वेळेत सुरू करण्याची मागणी केली. महापालिकेत समाविष्ट होऊनही या गावंमध्ये मूलभूत सुविधांची कामेसुरू नाहीत. डीपीमुळे त्याला गती मिळणार आहे. तसेच निधीही प्राप्त होणार आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका