शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जगण्याच्या वाटेवरील वारी

By admin | Updated: June 30, 2016 13:16 IST

विविध प्रकारची खेळणी अशा अनेक वस्तू विक्रीस मांडून पालखी सोहळ्याबरोबर मजल दरमजल करणारे सुमारे अडीचशे छोटे व्यावसायिक पालखी मार्गावर भेटले.

पिंपरी : लहान मुलांची छोटी बाबागाडी, त्यावर फुगे, विविध प्रकारची खेळणी अशा अनेक वस्तू विक्रीस मांडून पालखी सोहळ्याबरोबर मजल दरमजल करणारे सुमारे अडीचशे छोटे व्यावसायिक पालखी मार्गावर भेटले. हे छोटे व्यावसायिक अडथळा ठरत नाहीत, तर एक प्रकारे पालखी सोहळ्याची शोभा वाढवितात. श्रीक्षेत्र देहू, आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन मिळते. खेळणी विक्रीतून अवघ्या वीस दिवसांत ते हजारो रुपयांची कमाई करतात. त्यांची लाखो रुपयांची उलाढाल होते. अनेक वर्षांपासून अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांनी पालखी मार्गाने जगण्याची वाट दाखवली, अशा भावना व्यक्त केल्या. श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. आकुर्डीतील पहिल्या मुक्कामानंतर सकाळीच पालखी पुण्याच्या दिशेने निघाली. या पालखी सोहळ्याबरोबर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या बाजूने छोट्या व्यावसायिकांची बाबा गाड्यांची रांग लागल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. बाबागाडीवर लहान मुलांना आकर्षित करणारी विविध प्रकारची खेळणी, फुगे, पिपाण्या अडकवलेल्या. त्याबरोबर बाबागाडीला मध्ये बांधलेल्या कापडी झोक्यात बाळ झोपलेले. दुसऱ्या बाजूला स्वयंपाकासाठी लागणारा स्टोव्ह अडकवलेला. एकीकडे अडवलेल्या पिशवीत कपडे असे सर्व काही घेऊन विंचवाच्या पाठीवर बिऱ्हाड या उक्तीप्रमाणे छोट्या व्यावसायिकांचा लवाजमा दृष्टिपथास येत होता. पालखी सोहळ्याचे तसेच त्यातील वारकऱ्यांच्या दिंड्या यांचे व्यवस्थापन कौतुकास्पद वाटते. पालखी सोहळ्याबरोबर चालणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे व्यवस्थापनसुद्धा दखल घेण्यासारखे आहे. संत तुकाराम पालखी सोहळ्यात वारीच्या रांगेच्या बाजूने मार्गक्रमण करणारे हे छोटे व्यावसायिक ज्या ठिकाणी थांबतील, त्या ठिकाणी जत्राच भरते. काही विक्रेते लोणी काळभोरपर्यंत, तर काही पुढे सासवडपर्यंत जातात. काही जण बाबागाडी घेऊन थेट पंढरपूरपर्यंत जातात. कोणी मुंबईहून, कल्याण येथून, तर कोणी मराठवाड्यातून आले आहे.बहुतांश परप्रांतीय हिंदी भाषिक आहेत. २०हून अधिक वर्षे झाली, दर वर्षी न चुकता पालखी सोहळ्यात खेळणी विक्रीसाठी येत असतो, असेही अनेकांनी सांगितले. गंगा सूरज पवार ही महिला म्हणाली, पालखी सोहळ्यात २० ते २५ हजारांची कमाई होते. पालखी सोहळ्यानंतर राहत असलेल्या परिसरात फिरून कपडे, बेडसीट विक्रीचा व्यवसाय करतो. रश्मी तसेच आर्या या महिलांनीसुद्धा खेळणी विक्रीतून पालखी मार्गावर समाधानकारक कमाई होते, असे नमूद केले. मराठवाड्यातून आलेल्या एकाने पालखी मार्ग जगण्याची वाट दाखविणारा मार्ग ठरला असल्याच्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)पालखी सोहळ्याबरोबर चालणारे खेळणी विक्रेते आषाढी वारीच्या काळात हजारो रुपयांची कमाई करतात. या विक्रेत्यांना खेळणी आणि कच्चा माल पुरवठा करणारी मोठी यंत्रणा आहे. उल्हासनगरमधून त्यांना पालखी मार्गावर वेळोवेळी आवश्यकतेनुसार माल उपलब्ध करून दिला जातो. छोट्याशा बाबागाडीवर खेळणी व अन्य विक्री साहित्य ठेवण्यास पुरेशी जागा नसते. मोठ्या प्रमाणावर माल घेऊन बाबागाडी ढकलणे अवघड जाते. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना माल पुरविणारी वाहने पालखी मार्गावरच फिरत असतात.