शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 12, 2017 04:45 IST

कोणत्याही किल्ल्यावर गडाचे गडपण जपणारे आणि त्याची साक्ष म्हणून पुरावे देत उपलब्ध असणाऱ्या अनेक वास्तू या बाबींमुळेच

अशोक खरात । लोकमत न्यूज नेटवर्कखोडद : कोणत्याही किल्ल्यावर गडाचे गडपण जपणारे आणि त्याची साक्ष म्हणून पुरावे देत उपलब्ध असणाऱ्या अनेक वास्तू या बाबींमुळेच तो किल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, या वास्तू आणि हे पुरावेच जर काळाच्या ओघात लोप पावले, तर कोणताही किल्ला हा केवळ एक डोंगर म्हणूनच ओळखला जाईल. जुन्नरपासून २० किमी अंतरावर आपल्या अवाढव्य भिंतींसह अभेद्य आणि पायथ्याजवळून पाहिल्यानंतर काळजात धडकी भरवणारा किल्ले चावंडवरील वाडे, स्नानगृह आणि इतर विविध अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.चावंड किल्ल्यावरील पुष्करणी व तिचे कोरीवकाम पाहता, त्या ठिकाणी तत्कालीन भव्य असे मंदिर असावे, असा निष्कर्ष काढता येऊ शकतो आणि चावंड किल्ल्याची जुन्नरमधील जागा, इतर बांधकामांचे अवशेष बघता इथे नक्कीच कोणी तरी तत्कालीन इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती वास्तव्याला होत्या, याला दुजोरा मिळतो. जुन्नरच्या पश्चिमेला २० किमी अंतरावर सह्याद्रीच्या बालाघाट रांगेत वसलेला आखिवरेखीव किल्ला म्हणजे चावंड किल्ला होय. चहूबाजूंनी कातळाच्या दीडशे-दोनशे फूट उंच नैसर्गिक निर्माण झालेल्या कातळ भिंती म्हणजे या किल्याचे वैशिष्ट्य. घळीतून वर जाणारा मार्ग पर्यटकांना चढण्यास सोपा जावा व पर्यटक येथे आकर्षिला जाऊन येथील रहिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून वन विभाग जुन्नरच्या प्रयत्नांनी पायरीमार्ग व रेलिंग केले.