शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निविदा न काढताच चांगल्या रस्त्याची ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:01 IST

सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या अट्टहासासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच सुस्थितीतील चांगला रस्ता खोदून कामाला सुरुवात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत उघडकीस आला आहे.

पुणे : सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या अट्टहासासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच सुस्थितीतील चांगला रस्ता खोदून कामाला सुरुवात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत उघडकीस आला आहे. यामध्ये ठेकेदारांनी रिंग करून राजकीय पुढा-यांच्या मदतीने निविदा प्रकारात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी सांगितले, की महापालिकेच्या वतीने निविदा प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वीच ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात रस्ता खोदून ठेवला आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच व अत्यंत सुस्थितीत असलेला रस्ता खोदण्यात आला. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने या एकाच रस्त्याच्या कामासाठी तीन वेगवेगळ्या निविदा काढल्या आहेत. यासाठी मोठ्या चलाखीने रस्त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. या कामासाठी तरतूद उपलब्ध नाही, स्थायी समितीने रस्त्यांसाठी निधी वर्गीकरणास मंजुरी दिलेली नाही, असे असताना सुमारे ४० ते ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असलेला रस्ता खोदण्यात आला आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने नियमबाह्य पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवली असून, यामध्ये अधिकारी व राजकीय लोकप्रतिनिधी यांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असल्याचा आरोप बागवे यांनी केला आहे. दरम्यान भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अंधाधुंद पद्धतीने कामे सुुरु आहेत. चांगल्या अवस्थेमध्ये असलेले रस्ते खोदले जातात, यामध्ये महापालिकेवर आर्थिक बोजा पडत आहे. अधिकारी आणि अभियंते हे राजकीय कार्यकर्त्यांची भूमिका बजावत असल्याचा आरोप बागवे यांनी केला आहे.>आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षतापुणे शहरामध्ये २४ तास पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी १७०० किलोमीटरचे रस्ते खोदले जाणार आहेत. त्यामुळे आता सिमेंटचे रस्ते केल्यास ते पुन्हा खोदले जातील त्यामुळे अशी कामे करू नयेत असे आदेश दिले असताना देखील जाहिरात काढण्यात आली.विशेष म्हणजे काम कोणाला मिळणार हेसुद्धा ठरले आहे. त्यामुळे महापालिकेची निविदा प्रक्रिया पारदर्शक नाही तर रिंग पद्धतीने चालत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.काही नगरसेवकांचेच कार्यकर्ते ठेकेदार झाले असून, आता अशा रिंगचे प्रमाण महापालिकेत वाढले आहे.