शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठ्यांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:45 IST

पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतेय पायपीट

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या पाण्याच्या जलस्रोतांनी व पाण्याच्या साठ्यांनी यावर्षी जानेवारी महिन्यातच तळ गाठले आहेत. यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना लवकरच दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. पाण्यासाठी या परिसरात टँकरची मागणी वाढू लागली आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोरे परिसर मुसळधार पडणाºया पावसाचे माहेरघर समजला जातो. पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला जातो. परंतु उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. वर्षानुवर्षे या भागातील लोकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.महत्त्वाचे म्हणजे या भागामध्ये असणाºया विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे, तळी, शेततळी हे मुख्य असणारे जलस्रोत या भागामध्ये पडणाºया मुसळधार पावसामध्ये तुडुंब भरतात. परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. या परिसरामध्ये काढण्यात आलेल्या कूपनलिकांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी जनता दुष्काळाचे हाल सोसत आहे. पावसाळ्यामध्ये भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोºयामध्ये मुसळधार पाऊस पडतो. परंतु उन्हाळ्यामध्ये या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पाण्यासाठी या भागातील आदिवासी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागते. श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण (आंबेगाव) येथील पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाºया श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसरातील गावांना लवकरच पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जसजसा उन्हाळा जाणवू लागला आहे तसतशा उन्हाळ्याच्या झळा या भागामध्ये सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे या भागातील आदिवासी बांधवांना तीव्र दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. दरवर्षी या भागातील आदिवासी जनतेला एप्रिल, मे महिन्यामध्ये दुष्काळाशी सामना करावा लागत होता; परंतु यंदा याआधीच पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. डिंभे धरण आदिवासी भागाच्या उशाला असून कित्येक वर्षे आदिवासी जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. या भागात असणाºया विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडित बंधारे, तळी, शेततळी हे मुख्य असणारे जलस्रोत जानेवारी महिन्यातच आटू लागून तळ गाठू लागली आहेत. हे जलस्रोत या भागामध्ये जीवनदायी ठरत असल्याने ते आटू लागल्यामुळे पुढील काळासाठी आदिवासी बांधवांपुढे दुष्काळाविषयी मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या भागातील जनतेबरोबरच जित्राबांनाही या दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई