शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मिळणार २४ तास, मात्र पाणीपट्टीत मोठी वाढ

By admin | Updated: January 18, 2016 01:23 IST

शहराला २४ तास मीटरने पाणी पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे.

पुणे : शहराला २४ तास मीटरने पाणी पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. त्याकरिता दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी पाणीपटट्ीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला आहे. या प्रस्तावाला मुख्यसभेने पाठिंबा द्यावा याकरिता आयुक्तांनी जपानच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी सर्व पक्षीय नगरसेवकांच्या बैठका घेऊन त्यांना योजनेची आवश्यकता स्पष्ट केली आहे. शहराची भौगोलिक रचना बशीसारखी असल्याने, तसेच शहरातील वितरण व्यवस्था अतिशय जुनी असल्याने शहराला असमान पाणीपुरवठ्याला तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेमधील अस्तित्वातील जलशुद्धीकरण केंद्रे, पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था इत्यादींचा अभ्यास करून शहराला एकसमान २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे.शहराची २०४७ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून ही योजना आखण्यात आली आहे. त्या वेळी शहराची लोकसंख्या ७३ लाख ७५ हजार असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. सध्याच्या साठवण टाक्यांची क्षमता कमी असणे, वितरण व्यवस्था योग्य नसणे, पाणीपुरवठ्याचा कालावधी व प्रेशर यामध्ये तफावत असणे, जुन्या वितरण नलिकांमधील लिकेजस त्यामुळे मोठयाप्रमाणात वाया जाणारे पाणी या प्रमुख त्रुटी आढळून आल्या आहेत. शहरामध्ये सध्या ७ जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. नवीन ४ जलशुद्धीकरण केंद्रांचे काम प्रगतिपथावर आहे. शहराचे १४१ पाणीपुरवठा विभाग व ३२८ उपविभाग पाडण्यात आले आहेत. नवीन पाणीपुरवठा विभागाप्रमाणे वितरण व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात आली आहे. सध्याच्या वितरण नलिकांमधील जुन्या व कमी व्यासाच्या नलिका बदलण्यात येणार आहेत. नवीन वितरण व्यवस्थेमुळे प्रत्येक विभाग व उपविभागास योग्य व पुरेशा दाबानुसार पाणीपुरवठा केला जाईल. अस्तित्त्वातील जलवाहिन्यांचे नेटवर्क मॉडेलिंग करण्यात आलेले आहे. याकरिता दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.