शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांत पाणीतंटे

By admin | Updated: January 15, 2016 04:03 IST

दौंड तालुक्यातील माटोबा तलावात पाणी असूनही पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी परिसरातील सुमारे १४ गावांना टंचाईच्या झळा बसत आहेत. यामुळे पाण्यासाठी ‘तू तू मै मै’

यवत : दौंड तालुक्यातील माटोबा तलावात पाणी असूनही पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी परिसरातील सुमारे १४ गावांना टंचाईच्या झळा बसत आहेत. यामुळे पाण्यासाठी ‘तू तू मै मै’ सुरू झाली आहे. गुरूवारी यवत व उंडवडी व लडकतवाडी ग्रामपंचायतीत सुरू असलेला वाद अखेर मिटला.नाथाची वाडी येथील माटोबा तलावावरून परिसरातील १३ ते १४ गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. पाणीपुरवठा योजनांमध्ये काही ग्रामपंचायतींनी तलावालगत बंधारे बांधून त्यालगत विहीरी घेवून पाणी योजना केल्या आहेत. काही ग्रामपंचायतींनी थेट तलावातील पाणी उचलून त्याचे शुद्धीकरण करून पाणीपुरवठा योजना केल्या आहेत. सद्य परिस्थितीत तलावाच्या बाजूला विहीर घेऊन पाणीपुरवठा योजना केलेल्या ग्रामपंचायतींच्या योजना अडचणीत आल्या आहेत. बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाची पाणीपट्टीदेखील काही ग्रामपंचायतींनी भरली आहे. मात्र, वेळेत पाणी सोडले जात नसल्याने ग्रामपंचायतींच्या कारभारी मंडळींमध्ये वाद होऊ लागले आहेत. असाच वाद यवत व उंडवडी व लडकतवाडी ग्रामपंचायतीत होता. यवत ही सर्वाधिक जास्त लोकसंख्येची ग्रामपंचायत आहे. सुमारे २० हजार लोकसंख्या गावात आहे. यवत गावाची माटोबा तलाव येथील पाणीपुरवठा विहीर तलावापासून काही अंतरावर असून, त्याअगोदर उंडवडी व लडकतवाडी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरी आहेत. यवत गावाच्या पाणीपुरवठा विहिरीलगत असलेल्या बंधाऱ्यात पाणी येत नाही. उंडवडी व लडकतवाडी गावांच्या विहिरीजवळ बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवून ठेवले जात असल्याने वाद निर्माण झाला होता. आज अखेर सर्व गावकारभारी व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तोडगा काढण्यात आला.यवत गावाच्या विहिरीत पाणी यावे, यासाठी माटोबा तलावालगत असलेल्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी गावातील पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, यवतचे उपसरपंच सुभाष यादव, माजी सरपंच दशरथ खुटवड, ग्रामविकास अधिकारी संपत वाबळे, दौड तालुका भारिपा-बहुजन संघाचे अध्यक्ष उत्तम गायकवाड, माजी उपसरपंच सदानंद दोरगे, लालू जांबले, बाबासाहेब दोरगे, बाळासाहेब सापळे, धुळा भिसे आदी जेसीबी मशीन घेऊन तेथे पोहोचले.या वेळी लडकतवाडीचे सरपंच संदीप लडकत, उंडवडी गावाच्या सरपंच रोहिणी पांढरे, माजी पंचायत समिती सदस्य उद्धव फुले, माजी सरपंच मुरलीधर भोसले व ग्रामस्थांनी उंडवडी व लडकतवाडी गावांच्या बंधाऱ्यात पाणी ठेवा आणि यवत गावाच्या बंधारादेखील भरून घ्या, अशी मागणी केली. याला यवत ग्रामस्थांनी सहमती दर्शविली. यानंतर यवत गावाच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ असलेल्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले.यवतसाठी ठोस उपाययोजना गरजेची...यवत गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दौंड-पुणे लोकल सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर गावाचा परिसर पुणे शहराचे उपनगर म्हणून विकसित होऊ पाहत आहे. यामुळे भविष्यातील पाणी समस्या विचारात घेता. आतापासूनच आणखी पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे बनत चालले आहे.माटोबा तलावातील पाण्याचे नियोजन गरजेचे...नाथाची वाडी येथे असलेला ब्रिटिशकालीन माटोबा तलाव परिसरातील अनेक गावांसाठी वरदान ठरत आहे. मात्र, सद्य परिस्थितीत तलावात पिण्यासाठी पाण्याचा मुबलक साठा असूनदेखील योग्य नियोजन नसल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यासाठी तलावातील पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे बनले आहे.