शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

पाणीपट्टी दुप्पट, मिळकत करात १० टक्के वाढ

By admin | Updated: December 23, 2015 00:15 IST

महापालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षामध्ये पाणीपट्टीमध्ये थेट दुपटीने, तर मिळकत करामध्ये १० टक्के इतकी मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : महापालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षामध्ये पाणीपट्टीमध्ये थेट दुपटीने, तर मिळकत करामध्ये १० टक्के इतकी मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पुढील आठवड्यात स्थायी समितीसमोर मांडण्यात येईल. या दरवाढीला स्थायी समिती व मुख्य सभेने मंजुरी दिल्यास पुणेकरांचे कंबरडे मोडणार आहे. एलबीटी बंद झाल्याचा थेट फटका करवाढीच्या रूपाने सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.पालिकेचे २०१६-१७ चे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिकेला दर वर्षी एलबीटीपोटी १,२०० ते १,३०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. राज्य शासनाने एलबीटी बंद केल्याने आता पालिकेला शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. त्याचबरोबर, बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याने त्यापोटी मिळणाऱ्या कराचेही उत्पन्न कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर, उत्पन्न वाढविण्यासाठी पाणीपट्टीमध्ये दुपटीने, तर मिळकत करामध्ये १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या करवाढीला स्थायी समितीने मंजुरी दिल्यास महापालिकेला यामधून १३६ कोटी ५७ लाख रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळणार आहे. तर, मिळकरातील १० टक्के वाढीमुळे ७६ कोटी ३८ लाख रुपयांचे उत्पन्न वाढणार आहे. या सर्व दरवाढीमुळे २०१६-१७ वर्षासाठी मिळकत करापोटी पालिकेला १,२८९ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवलेल्या प्रस्तावामध्ये म्हटले आहे.या दरवाढीनंतर पुणेकरांना पाणीपट्टीसाठी ९०० ते १,१०० रुपयांऐवजी १,८०० ते २,२०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, मिळकत करामध्ये १० टक्के वाढीव कर भरावा लागणार आहे. निवासी मिळकतींसाठीच दुप्पट, तर व्यावसायिक मिळकती आणि अमृततुल्य यांच्या पाणीपट्टीमध्ये अडीच पट वाढ सूचविण्यात आली आहे. याला मान्यता मिळाल्यास ६०० रुपयांऐवजी दीड हजार रुपये भरावे लागतील. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविणाऱ्या आयुक्तांनी करवाढीच्या रूपाने कंबरडे मोडण्याचा प्रस्ताव ठेवल्याने त्याला पुणेकर नागरिकांकडूनही मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. मोठ्या मिळकत कर थकबाकीदारांकडूनन वसुली करण्यात अद्याप पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. बेकायदेशीरपणे नळजोड घेतलेल्यांसाठी अभय योजना आणूनही तिला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर, नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांवर पुन्हा करवाढीचा बोजा टाकणे अन्यायकारक ठरणार आहे. मोठे थकबाकीदारांकडून मिळकत कराची वसुली करण्यास प्रशासनाने प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.