शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

निमगावात पाण्याचे टँकर बंद

By admin | Updated: April 19, 2016 01:04 IST

निमगाव केतकी व वाड्यावस्त्यांवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेले पाण्याचे टँकर अचानक बंद करण्यात आल्याने पाण्याची टंचाई पुन्हा निर्माण झाली आहे.

निमगाव केतकी : निमगाव केतकी व वाड्यावस्त्यांवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेले पाण्याचे टँकर अचानक बंद करण्यात आल्याने पाण्याची टंचाई पुन्हा निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईची झळ केतकेश्वर महाराज यात्रेच्या निमीत्ताने येणाऱ्या भाविकांना बसणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, बंद करण्यात आलेले पाण्याचे टँकर तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावेत, याकरिता जिल्हा परिषेद सदस्य देवराज जाधव पाठपुरावा करीत आहेत. मात्र, तलाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून टँकर सुरू करण्यासाठीची कोणतीही कार्यवाही अद्याप केली जात नसल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री केतकेश्वरमहाराज यांची यात्रा तीन दिवस भरवली जाते. या यात्रेच्या निमित्ताने नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असलेले नागरिक गावी येतात. याबरोबरच, यात्रेमध्ये व्यवसाय करण्यासाठी पाळणेवाले, खेळणीविक्रेते, फळविक्रेते, खाद्य पदार्थविक्रेते, आइस्क्रीमविक्रेते आदी येतात. त्यांना पाण्याची आवश्यकता असते; परंतु पाणीटंचाई असल्याने या व्यवसायिकांना पाणी कसे पुरवायचे, याचे आव्हान ग्रामपंचायतीसमोर निर्माण झाले आहे. यात्रेच्या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी रथाची मिरवणूक काढली जाते. या वेळी निमगाव केतकीसह परिसरातील अनेक गावांतील भाविक श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. काही भाविक नवस फेडण्यासाठी येतात. या मिरवणुकीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे अवश्यक असते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्रीकेतकेश्वर महाराजांच्या पालकीची मिरवणूक काढण्यात येते.या वेळी हे कार्यक्रम पाहण्यासाठी महिला व पुरुष मोठया संख्येने परिसरातून येतात. या वेळी आलेल्या यात्रेकरूंची पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे असते.