शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक वाहनातून पाणीपुरवठा

By admin | Updated: April 24, 2016 04:22 IST

बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यास पाणीप्रश्न सोडविण्यास एमआयडीसी प्रशासन अद्यापही अयशस्वी ठरले आहे. गेल्या सहा दिवसांपासून या परिसरातील

बारामती : बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यास पाणीप्रश्न सोडविण्यास एमआयडीसी प्रशासन अद्यापही अयशस्वी ठरले आहे. गेल्या सहा दिवसांपासून या परिसरातील पाणीपुरवठा ठप्प आहे. अखेर शनिवारी (दि. २३) अखेर नगरपालिका प्रशासनाची मदत घेण्यात आली. येथील ‘रेसिडेन्शियल झोन’मध्ये अग्निशमन वाहनामधून पाणीपुरवठा करण्यात आला.पाणीपुरवठ्याअभावी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अनेकांची नोकरी संभाळून पाण्यासाठी भटकंती करताना दमछाक होत आहे. अखेर पाणीपुरवठा न सुरू झाल्याने बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी पाण्याच्या समस्येबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी त्याची तातडीने दखल घेत याबाबत नगराध्यक्ष योगेश जगताप यांना सूचना दिल्या. त्यानंतर येथील नागरिकांना अग्निशामक वाहनातूनच पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.काकडे यांनी सांगितले, की वेळेत पाणीपुरवठा करण्याचे एमआयडीचे प्रशासनाचे आश्वासन प्रत्यक्षात अपूर्णच आहे. आज सहावा दिवस आहे. या भागात अक्षरश: एक थेंबदेखील पाणीपुरवठा झालेला नाही. उद्योजकांनी मुख्य अभियंता पाटील यांच्याकडे येथील नियोजनाच्या अभावाची तक्रार केली आहे. पोलीस प्रशासनाशी पाणीचोरीबाबत तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांना समज दिली आहे. आगामी काळात पाणी जलवाहिनी फोडण्याचे प्रकार झाल्यास पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार आहे. बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले, की उद्योजकांच्या तक्रारीनंतर पाणीचोरी बंद होण्याची आशा आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीतून बारामतीच्या पाणीपुरवठा केंद्रात पाणी पोहोचले आहे. रात्रीपर्यंत पुरेसा साठा झाल्यानंतर उद्या सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल. (प्रतिनिधी)प्रशासनाचा दावा खोटाउजनीतून पाच ते सहा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोडल्यानंतर पाणीपातळी कमालीची घटली. परिणामी, बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. तर, ढिसाळ नियोजनामुळे दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचा एमआयडीसी प्रशासनाचा दावादेखील खोटा ठरला आहे.