शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरला चार टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: April 16, 2016 03:49 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोडनदीवरील बंधाऱ्यात पाण्याचा विसर्ग येण्यास दोन दिवस लागणार असून, नागरिकांच्या सोयीसाठी नगर परिषदेने चार पाण्याचे टँकर सुरू केल्याची

शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोडनदीवरील बंधाऱ्यात पाण्याचा विसर्ग येण्यास दोन दिवस लागणार असून, नागरिकांच्या सोयीसाठी नगर परिषदेने चार पाण्याचे टँकर सुरू केल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली. शहरातील २८ बोअरवेल्सही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.शिरूरच्या पुढे आंबेगाव हद्दीपर्यंत असणाऱ्या बंधाऱ्याचे ढापे काढून पाण्याचा विसर्ग शिरूरच्या बंधाऱ्यात आणण्यासाठी नगर परिषदेचे गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांनी काढलेले ढापे पुन्हा काढू नये म्हणून नगर परिषदेचे कर्मचारी २४ तास वरील बंधाऱ्यांच्या ठिकाणी गस्त घालत आहेत. आमदाबादपर्यंत पाणी आले असून, शिरूरच्या बंधाऱ्यात परवा पहाटेपर्यंत पाणी विसर्ग येण्याची शक्यता असल्याचे थोरात यांनी सांगितले. गेल्या सहा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प आहे. अशात नागरिकांच्या सोयीसाठी नगर परिषदेने चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तहसीलदारांना विनंती केल्याने उद्या आणखी तीन टँकर सुरू होतील, असे थोरात यांनी सांगितले. २८ बोअरवेल्स सुरू असून, तेथेही नागरिकांची पाण्याची सोय करण्यात आली आहे. ज्यांना शक्य आहे, अशा नागरिकांनी पाण्याच्या टँकर (खासगी) मागणीवर भर दिला असून, मागणी वाढल्याने टँकरचीही कमतरता भासू लागली आहे. डिंभेतून मागवलेले आवर्तन कॅनॉलद्वारे सोडण्यात येणार असून, हे आवर्तन ‘टेल टू हेड’ असल्याने हे आवर्तन शहराला मिळण्यासाठी मे उजाडणार आहे. या आवर्तनाने बंधारा भरण्याची शक्यता आहे.पाण्याच्या टँकरचे दरही यामुळे ७०० रुपयांहून १००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. नगर परिषदेने टँकर सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळेलबंधाऱ्यात पाणी आल्यावर शहराला पुन्हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. पंधरा दिवस पुरेल एवढाच हा साठा असेल.