शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीचा पाणीपुरवठा सातव्या दिवशी सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 02:43 IST

एमआयडीसीचा पाणीपुरवठा सातव्या दिवशी सुरू करण्यात अखेर एमआयडीसी प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान निवासी झोनमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे

बारामती : एमआयडीसीचा पाणीपुरवठा सातव्या दिवशी सुरू करण्यात अखेर एमआयडीसी प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान निवासी झोनमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. मात्र, एमआयडीसीची यंत्रणा तोकडी पडल्यामुळे बारामती नगरपालिकेने पुढाकार घेऊन येथील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष योगेश जगताप, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली. बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा अखेर सातव्या दिवशी सुरू करण्यात एमआयडीसी प्रशासनाला यश आले आहे. रविवारी (दि. २४) पहाटे ५ वाजता एमआयडीसीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. गेल्या ६ दिवसांपासून हा पाणीपुरवठा ठप्प होता. उद्योगांसह येथील रहिवाशांना यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. दरम्यान, एमआयडीसीचा भाग नगरपालिकेच्या हद्दीत येत नाही. परंतु, बारामतीकर नागरिक म्हणून तेथील रहिवाशी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला. हद्दवाढीतील रुई भागाला देखील टँकरने पाणीपुरवठा करीत असताना एमआयडीसीच्या नागरिकांना देखील माणुसकीच्या भावनेतून पाणीपुरवठा केला, असे नगराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.उजनी जलाशयाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली. परिणामी एमआयडीसीचा पाणीपुरवठादेखील बंद झाला. मंगळवारी (दि. १९) हा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. उद्योगांवर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली. तर येथील परिसरात होणाऱ्या नागरिकांनी जारमधील पाणी विकत आणले. अनेकांवर वापराचे पाणी आणण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. पाणी आणण्याचा एमआयडीसी प्रशासनाचा प्रयत्न सुरू असताना जीर्ण जलवाहिनीतून एमआयडीसीला पाणी आणताना होणारी चोरी थांबविण्यासाठी उद्योजकांनी आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांकडे एमआयडीसीच्या अभियंत्यांनी पाणी वापरणाऱ्या संबंधितांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना कडक शब्दांत समज दिली. त्यामुळे एमआयडीसीतून होणारी गळती थांबविण्यात पोलिसांना यश आले. तसेच, एमआयडीसीला पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्य झाले. बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत थेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. बारामती नगरपालिका प्रशासनाने पाणीटंचाईच्या काळात टँकरची सोय केल्याने एमआयडीसीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला. कार्यकारी अभियंता अ‍े. के. आगवणे यांनी सांगितले की, रविवारी पहाटे ५ वाजल्यापासून एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच, रेसिडेन्शीयल झोनमध्ये पुरेशा दाबाने ३ तास पाणीपुरवठा होईल, यासाठी दोन विद्युतपंप सुरू करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)