शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या गावांचा पाणीपुरवठा अडचणीत

By admin | Updated: May 7, 2017 02:26 IST

अकस्मात निर्माण झालेल्या या भारनियमनाच्या संकटामुळे फुरसुंगी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोलीसारख्या

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : अकस्मात निर्माण झालेल्या या भारनियमनाच्या संकटामुळे फुरसुंगी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोलीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजना संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.गेल्या चार दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीकडून विजेच्या तुटवड्याचे कारण सांगून होत असलेल्या अघोषित भारनियमनामुळे बळीराजासमवेत सर्वसामान्य नागरिकही हैराण झाला असल्याचे चित्र हवेली तालुक्यात दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुळा-मुठा नदीतिरावर असलेल्या कोलवडी या गावात १४ तास तसेच उरुळी कांचन उपविभागातील अष्टापूर, बिवरी, हिंगणगाव, भवरापूर या गावांत नदीजवळ असूनही तसेच कालव्यावर अवलंबून असलेल्या वळती, शिंदवणे, डाळिंब तरडे या गावांतही भारनियमनामुळे शेतीसिंचनासाठी पाणी उचलता येत नाही. प्ाूर्वी डिझेल इंजिनाचा वापर होत होता. त्यांमुळे विद्युतप्रवाह खंडित झाला तरी पाणी उचलले जात होते. परंतु, आता ती कालबाह्य झाली  असून शेतकऱ्यांना विद्युत मोटारींशिवाय पर्याय नाही.  त्यामुळे विद्युतप्रवाह खंडित झाला  की, त्याला वीज येण्याची वाट  पाहावी लागते.या परिसरात मुख्यत्वेकरून मेथी, कोथिंबीर, पालक, फ्लॉवर, कोबी या भाजीपाल्यासह उसाची लागवड केली जाते. उन्हाळ्यात भाजीपाला जळून जातो. म्हणून कमी पाण्यात जास्त व चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळावे व आपणास चार पैसे जास्त मिळावेत, या उद्देशाने येथील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरून ठिंबक सिंचनाद्वारे पाणी देणे सुरू केले आहे. ठिंबक सिंचनाद्वारे पाणी रोज द्यावे लागते. यामुळे भर उन्हाळ्यात भरघोस उत्पादन मिळते. परंतु, कसलेही वेळापत्रक जाहीर न करता सुरू झालेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेली नगदी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.