शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईच्या झळा तीव्र

By admin | Updated: March 5, 2016 00:46 IST

बारामती तालुक्यातील जिरायती भागात वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक गावे व वाड्या-वस्त्यांमधून टँकरची मागणी पुढे येऊ लागली

लोणी भापकर : बारामती तालुक्यातील जिरायती भागात वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक गावे व वाड्या-वस्त्यांमधून टँकरची मागणी पुढे येऊ लागली आहे. सध्या तालुक्यातील जिरायती पट्ट्यात वीस टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी तीन टँकरला नव्याने मंजुरी मिळाल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, काही भागात अवकाळी व वादळी पावसामुळे पिकांचे व घरांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. तालुक्यातील जिरायती पट्ट्यात मागील तीन वर्षे पावसाने हुलकावणी दिली आहे. खरीप व रब्बीचे सलग दोन हंगाम वाया गेले आहेत. यावर्षी ज्वारीच्या पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी ज्वारीचे बाटूकही हाती लागले नाही. विशेषत: कऱ्हा नदीच्या उत्तरेकडील भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात टँकर सुरू ठेवावे लागले होते. सध्या या पट्ट्यातील गोजुबावी ते कुतवळवाडी वढाणे यातील पारवडी व शिर्सुफळ वगळता सर्वच ठिकाणी टँकरने पाणी पुरविले जात आहे. त्यातही शिर्सुफळ गावातून नव्याने टँकरची मागणी होत आहे. याच भागातील सोनवडी सुपे, कारखेल देऊळगाव रसाळ, उंडवडी आदी भागातील वाड्या-वस्त्यांवरील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. आणखी टँकरची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. > स्वतंत्र टँकरची मागणीसध्या घरातील माणसांना पिण्याच्या पाण्याची तजवीज करताना धावपळ करावी लागत असताना, दारातील जनावरांना पाणी आाणायचे कोठून, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. तालुक्याच्या मोरगाव ते कऱ्हावागज या बावीस गावांपैकी मोरगाव-बारामती रस्त्यालगतच्या काही गावांत नाझरे जलाशयावरील पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळते. परंतु, अपुरा व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे याही भागातून स्वतंत्र टँकरची मागणी होत आहे. या भागातील भिलारेवाडी व सायंबाची वाडी या दोन गावांसाठी एक, तर तरडोली व मासाळवाडी यांसाठी एक, तर लोणीभापकर या गावासाठी एक अशा आणखी तीन टँकरना मंजुरी मिळाल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली.