शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ऊस लागवडीवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: June 29, 2017 03:27 IST

नीरा खोऱ्यातील साखर कारखान्यांचा आडसाली ऊस लागवड हंगाम दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : नीरा खोऱ्यातील साखर कारखान्यांचा आडसाली ऊस लागवड हंगाम दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, पाऊस लांबल्याने या ऊस लागवडींवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नीरा डावा कालवा बंद झाला तरीही शेतकऱ्यांनी विहिरी व बोअरवेलच्या सोय केल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १ जुलै व ७ जुलैला ऊस लागवड दरवर्षीप्रमाणे होईल. मात्र सध्या नीरा डाव्या कालव्याला पाणी नाही, पाऊस नाही. त्यामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी घटली आहे. परिणामी ऊस लागवडी होऊ शकणार नाहीत. पाऊस चांगला झाला तर नीरा खोऱ्यात १५ हजार एकरांच्या आसपास आडसाली ऊस लागवडी केली जाते. कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात पाऊस पडला नाही. तरीही शेतकरी नीरा देवधर, भाटघर व वीर या तीन धरणांच्या भरवशावर ऊस लागवडी करत असतो. मात्र, जून महिना संपला तरीही धरण क्षेत्रात पावसाचा एक थेंबही पडला नाही. सध्या नीरा देवघर धरणात ६.८० टक्के, भाटघर धरणात ४.२९ टक्के,तर वीर धरणात ४.५८ टक्केपाणीसाठा उरला आहे. तो पाणीसाठा पालखीसाठी पिण्यासाठी राखून ठेवलेला असतो. त्यामुळे ऊस लागवडीसाठी आता नीरा डाव्या कालव्याचे पाणी मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या आवाक्यात मोठा ऊस व नवीन ऊस लागवड जगवणे अवघड जाणार आहे, अशा शेतकऱ्यांनी नवीन ऊस लागवडीचे काहीसे क्षेत्र कमी केले आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची उपलब्धता नाही, अशा शेतकऱ्यांनी पाऊस पडेपर्यंत ऊस लागवड करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.