शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरात कमी दाबाने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 8, 2015 05:16 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खडकवासला कालव्याद्वारे तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या

इंदापूर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खडकवासला कालव्याद्वारे तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना देवून तब्बल २१ दिवस उलटून गेले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे हीच मागणी करून पाच दिवस उलटून गेले. तरी देखील काही ही उपयोग न झाल्यामुळे इंदापूर नगरपरिषदेचे प्रशासन हतबल झाले आहे.त्वरित उपाय न झाल्यास लोकांचा असंतोष भडकेल, असे चित्र दिसत आहे. मार्च २०१५ मध्ये तरंगवाडी तलावाची पाण्याची पातळी खालावल्यानंतर, खडकवासला कालव्याद्वारे तलावात दोन तीन दिवस पाणी सोडण्यात आले. पाण्याची पातळी चार फुटाने वाढली. तत्पूर्वी १८ मार्चपासून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येवू लागला. पाण्याचा वापर व बाष्पीभवन यामुळे पाण्याची पातळी खालावली. या घडामोडी होवून तब्बल २१ दिवस उलटून गेले. मात्र कालव्याचे पाणी तलावापर्यंत पोहोचले नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे,पाणी टंचाई उग्र रूप घेवू लागली आहे. दिवसाआड अपूरा पाणी पुरवठा होत असल्याने लोकभावना भडकत आहे. राजकीय मंडळीची बेपर्वाई, पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ धोरणाचे खापर नगरपरिषदेच्या डोक्यावर फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र दिसत आहे.