शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीसाठी दंडाच्या रकमेवर पाणी

By admin | Updated: January 6, 2016 00:51 IST

आर्थिक वर्ष अखेर जवळ आल्यामुळे पालिका प्रशासनाने मिळकतकर वसुलीचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आहे. थकबाकीची वसुली वाढावी यासाठी थकबाकीदारांना लावलेल्या दंडावर

पुणे : आर्थिक वर्ष अखेर जवळ आल्यामुळे पालिका प्रशासनाने मिळकतकर वसुलीचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आहे. थकबाकीची वसुली वाढावी यासाठी थकबाकीदारांना लावलेल्या दंडावर पाणी सोडणाऱ्या प्रशासनाच्या अभय योजनेला स्थायी समितीने काही उपसूचना देऊन आज (मंगळवार) मंजुरी दिली. या योजनेतून पालिकेच्या तिजोरीत सुमारे १८५ कोटी रुपयांची भर पडेल असा प्रशासनाचा अंदाज आहे.स्थानिक संस्था कर बंद झाल्यामुळे पालिकेचे उत्पन्न घटले आहे. ही घट भरून काढण्यासाठी प्रशासनाने आता मिळकतकर वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी राज्य सरकारनेच पालिकेला थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत सूट देणारी अभय योजना राबवण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे प्रशासनाने प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवला होता. समितीच्या काही सदस्यांनी त्याला उपसूचनांची जोड दिली व हा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली.समितीमध्ये या विषयावर चर्चा झाली, त्या वेळी सदस्य अविनाश बागवे यांनी सर्व थकबाकीदारांना सरसकट दंडमाफीची सवलत देण्याचा विरोध केला. प्रामाणिकपणे कर जमा करणाऱ्या नागरिकांवर हा अन्याय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अन्य सदस्यांनाही त्याला दुजोरा दिला. त्यामुळे प्रशासनाच्या प्रस्तावातून मोठ्या थकबाकीदारांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. यात मोठे व्यावसायिक, हॉटेल्स व अन्य काही बड्यांचा समावेश आहे. त्यांना आपली थकबाकी दंडासह जमा करावी लागेल. एकूण २ लाख ७१ हजार थकबाकीदारांना प्रशासनाच्या या अभय योजनेचा लाभ होईल. ११ जानेवारी ते १० मार्च या काळात वार्षिक २५ हजार रुपये किंवा त्या आतील थकबाकी एकरकमी जमा केली तर दंडाच्या रकमेतून त्यांना ७५ टक्के सवलत मिळेल. थकबाकी जमा करण्यासाठी त्यांनी दोन महिने लावले तर त्यांना दंडाच्या रकमेतून फक्त ५० टक्के सवलत मिळेल. यातून १८५ कोटी रूपये मिळणे अपेक्षित आहे.